ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षक दिनी आदर्श शिक्षकांचा सन्मान 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

माजी आमदार .श्री.सुदर्शन निमकर यांच्या वाढदिवसानिमित्याने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मान.श्री.हंसराजजी अहिर अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्ग आयोग,तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार सुदर्शन निमकर,संजय धोटे,.श्री.विजयरावजी बावणे,.श्री.सुरेशजी केंद्रे,श्री.शिवाजी सेलोकर,श्री.संदिप शेरकी,.श्री.संभाजी वारकड सर प्राचार्य शिवाजी महाविद्यालय राजुरा,श्री.अविनाश जाधव,.श्री.नंदकिशोर वाढई उपस्थित होते.मागील वर्षी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री.नागनाथ माधव बोरुळे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

सोबतच सन 2023-24मध्ये मान.मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तालुकास्तरिय प्रथम क्रमांक मिळाल्याने शाळेचे मुख्याध्यापक श्री. बंडू राठोड, श्री. नागनाथ बोरुळे श्री. मिलिंद मुसळे कु.पायल शिंदे कु.जागृती उपरे, श्री.दामोधर घुले यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये