ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
देऊळगाव राजा हायस्कूल येथे व्यसनमुक्तीवर पथनाट्य सादर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुका विधी सेवा समिती, वकील संघ, पोलिस स्टेशन, देऊळगाव राजा व बुलढाणा जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने देऊळगाव राजा हायस्कूल येथे 4 सप्टेंबर रोजी व्यसनमुक्ती वर पथनाट्य सादर करण्यात आले.खूप परिणामकारक पथनाट्य झाले,मुलांनी चांगला प्रतिसाद दिला
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तालुका विधी सेवासमिती चे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश श्री एम एस भरड, व एच एम बेग, उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम, सरकारी वकील ॲड अनिल शेळके, वकील संघ चे अध्यक्ष ॲड किशोर सरदार, पोलिस निरीक्षक ब्रह्म गिरी उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.