ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बीएड कॉलेजातील गैरव्यवहार प्रकरण : सहाय्यक प्राध्यापिकेवर फौजदारी गुन्हा दाखल करा – सुनीता लोढीया

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

सदगुरु जगन्नाथबाबा शिक्षण महाविद्यालय, नांदा येथे गंभीर गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या महाविद्यालयात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात केवळ नऊ महिन्यांच्या करारावर (घड्याळी तासिका तत्वावर) सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त झालेल्या कुमारी मंजुषा एम. मांडवकर यांनी बीएड अभ्यासक्रमातील प्रवेशित विद्यार्थ्यांकडून तब्बल ₹5 लाख 50 हजार रक्कम घेतल्याचा आरोप आहे. वारंवार मागणी करूनही या रकमेचा हिशेब संस्थेच्या अध्यक्षा सौ. सुनीता लोढिया यांना दिला गेला नसल्याची माहिती समोर आली आहे.

याव्यतिरिक्त, सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता गोंडवाना विद्यापीठाकडून कुठलीही नियुक्ती न झालेली असताना देखील कुमारी मंजुषा मांडवकर बीएड कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेत आहेत. एका विद्यार्थ्याकडून ₹50 हजार रुपये घेऊन पावती न दिल्याची तक्रार समोर आली आहे.

या गंभीर गैरप्रकाराबाबत सौ. सुनीता लोढिया (अध्यक्षा – वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ) यांनी दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी गडचांदूर पोलीस ठाण्यात कुमारी मंजुषा मांडवकर यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

यापूर्वीही नांदा येथील नामांकित प्रभू रामचंद्र विद्यालयात मान्यता नसताना सहाय्यक शिक्षिका भरती केल्याप्रकरणी शिक्षण विभागाने कारवाई केली आहे. त्यात मुख्याध्यापक अनिल रामचंद्र मुसळे आणि योगिता कुळमेथे यांच्याविरोधात शासनाची फसवणूक करणे व कलम 420 अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, अनिल मुसळे यांनी बोगस दस्ताऐवजांच्या आधारे स्वतःची मुख्याध्यापक पदावर नियुक्ती करून घेतल्याचेही उघड झाले आहे.

आता पुन्हा बीएड महाविद्यालयातील प्राध्यापिका मंजुषा मांडवकर यांच्या नियुक्तीचा कार्यकाळ संपूनही विद्यार्थ्यांचे प्रवेश करून त्यांच्याकडून ५०-५० हजार रुपये वसूल करणे आणि पावत्या न देणे या प्रकारांमुळे गंभीर संशय निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर सदगुरु जगन्नाथ बाबा महाराज शिक्षण महाविद्यालयातील सर्व गैरप्रकारांची गोंडवाना विद्यापीठामार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये