“महात्मा गांधी विद्यालयात पोषण सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
पोषण सप्ताहाच्या निमित्ताने महात्मा गांधी विद्यालयात 4 सप्टेंबर रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. सना यांनी १३ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांना पोषणाबाबत उपयुक्त माहिती दिली. यावेळी प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देखील देण्यात आल्या.
हा कार्यक्रम माणिकगड सिमेंट वर्क्सच्या सी एस आर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) उपक्रमाअंतर्गत घेण्यात आला.
या कार्यक्रमात मी एस आर व्यवस्थापक श्री शांतनु आकाश आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री साईनाथ मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना पोषणाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन सोनाली ठाकूर यांनी केले, तर मुख्याध्यापक साईनाथ मेश्राम यांनी सी एस आर टीमचे आभार मानले आणि असे उपक्रम सातत्याने राबवावेत, असे मत व्यक्त केले.