मोकाट जनावरांनी दिली वृद्धास टक्कर : वृद्ध जखमी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शहरात मोकाट जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे आज दिनांक ३ रोज बुधवार ला पहाटे दरम्यान फिरण्यासाठी गेलेल्या वृद्धास वाल्मीक चौकात एका मोकाट जनावरांनी टक्कर देऊन पाडले त्यामुळे ते जखमी झाले. या मोकाट जनावरावर अंकुश आणण्यास नगरपालिका असमर्थ ठरल्याचे दिसत आहे.
रामकृष्ण इंगोले वय ६५ वर्षे राहणार चणकापूर असे त्याचे नाव आहे. ते येथील आपल्या नातेवाईकाकडे आले होते पहाटे दरम्यान फेरफटका मारण्यासाठी निघाले असता एका मुलीच्या मागे हे मोकाट जनावर धावत आले त्याला रामकृष्ण यांनी फटकारले असता त्या वृद्धाला शिंगाने टक्कर देऊन दोनदा खाली पडले यामुळे ते जखमी झाले येथील काही इसमानी त्या जनावराला त्वरित हकल्याने मोठा अनंत ठरला. सध्या भद्रावती शहरात मुख्य रस्त्यावर, चौका चौकात मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात दिसत आहे त्यामुळे नागरिकांना परेशानीचा सामना करावा लागत आहे याबाबत राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्याला मोकाट जनावराच्या बंदोबस्त करण्या करीता लेखी निवेदन दिले.
मात्र याकडे मुख्याधिकाऱ्यांनी जाणीवपूर्व दुर्लक्ष केल्याने शहरात असले प्रकार घडत आहे एखांदी या प्रकारामुळे जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण असा जाब सुद्धा भद्रावती कर आता विचारत आहे.