राजुरा येथे भाजपा विधानसभा जनसंपर्क कार्यालय व मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राचे थाटात लोकार्पण
गोरगरिबांना न्याय व विकासाची गॅरंटी मिळेल - आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
या कार्यालयात येणारा प्रत्येक गोरगरीब बांधव जाताना समाधानाचा भाव चेहर्यावर घेऊन जाईल अशी सेवा याठिकाणी देवरावजी व त्यांचे सहकारी देतील असा विश्वास आहे. त्यामुळे आज लोकार्पित होणारे हे कार्यालय गोरगरिबांना न्याय आणि विकासाची गॅरंटी देणारे ठरेल असा आशावाद राज्याचे माजी मंत्री तथा आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केले.
राजुरा शहरातील जवाहरनगर परीसरातील श्री. बंडू सा. कल्लुरवार यांच्या जागेवर नव्याने तयार करण्यात आलेल्या भाजपा जनसंपर्क कार्यालय तथा मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
पुढे बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, मला नुकताच ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ पुरस्कार मिळाला असला तरी, देवरावजींच्या विकासाच्या प्रकाशातून या विधानसभा मतदारसंघातील समस्यांचा अंधकार दूर होईल, असा मला विश्वास आहे. या कार्यालयातून प्रत्येक गरजू व्यक्ती समाधानाने बाहेर पडेल हे या कार्यालयाची रचना पाहून वाटते. ‘पद येतं आणि जातं, परंतु चांगले सहकारी लाभणे हीच खरी कमाई असते’, असे सांगत कार्यकर्त्यांना चांगल्या सहकाऱ्यांसोबत जनतेची व पक्षाची सेवा करण्याचा सल्लाही त्यांनी मार्गदर्शनातून दिला.
आजचे लोकार्पण म्हणजे विकास, सेवा आणि संकल्पाचे नवोन्मेष! – आमदार देवराव भोंगळे
यावेळी आमदार देवराव भोंगळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. विकासाच्या बाबतीत मागे राहिलेल्या या मतदारसंघातील जनतेला विकासाची आशा होती. ‘विकासाचा वादा आणि देवराव दादा’ असे म्हणत जनतेने मला सेवेची संधी दिली. लोकांच्या सेवेचे हे व्रत अविरत सुरू ठेवण्याची ग्वाही त्यांनी दिली. आजचे लोकार्पण हे विकास, सेवा आणि संकल्पाचे एक नवोन्मेष असल्याचे ते म्हणाले.
या कार्यालयाच्या माध्यमातून मतदारसंघातील गरजू लोकांसाठी मदत आणि विकासाचे नवे पर्व सुरू होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीशजी शर्मा, जिल्हा महामंत्री विवेक बोढे, संध्या गुरनूले, प्रदेश महिला मोर्चाच्या महामंत्री कु. अल्काताई आत्राम, रेणुका दूधे, माजी उपमहापौर राहुल पावडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बंडू हजारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आबिद अली, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष गौतम तोडे, पीरीपाचे जिल्हाध्यक्ष हरीश दुर्योधन, धनोजे कुणबी समाजाचे जिल्हाध्यक्ष श्रीधर मालेकर, संवाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदूभाऊ वासाडे, प्रा. विजय बदखल, डॉ. रवी आल्लुरवार, डॉ. सुशील मुंदडा, डॉ. रोहन आईंचवार, डॉ. मनिष मुंदडा, डॉ. अजय दुद्दलवार, डॉ. चिनी, डॉ. आनंद बेंदले, सी.ए. पियुष मामडीवार, मनपाच्या माजी नगरसेविका सविता कांबळे, चंद्रकला सोयाम, संगीता खांडेकर, शिला चव्हाण, भाजपचे तालुकाध्यक्ष दिपक सातपुते, वामन तुराणकर, दत्ता राठोड, संजय मुसळे, सुरेश रागीट, अरविंद डोहे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, सतीश उपलेंचवार, अरूण मडावी, अमर बोडलावार, विनायक देशमुख, सुनील उरकुडे, अमोल आसेकर, बंडू सा. कल्लुरवार, मिलिंद देशकर, प्रशांत गुंडावार, संजय उपगण्लावार, केशव गिरमाजी, तुकाराम वारलवाड, राजेश राठोड, गोविंद टोकरे, पुष्पा सोयाम, प्रमोद कोडापे, पुरुषोत्तम भोंगळे, शशिकांत आडकिणे, आशिष ताजने, निखिल भोंगळे, दिनेश ढेंगळे, अरूण रागीट, रवी बंडीवार, सतीश जमदाडे, अबरार अली, विजयालक्ष्मी डोहे, शितल धोटे, महेश घरोटे, विक्की उरकुडे, सतीश बेतावार, दिपक वरभे, सतीश कोमरवल्लीवार, बाळनाथ वडस्कर, शंकर मडावी, दिलीप गिरसावळे, हरिदास झाडे, सिनू मंथनवार, यशोधरा निरांजने, गौरी सोनेकर, पौर्णिमा उरकुडे, सुनंदा डोंगे, सुचिता माऊलीकर, दिपा बोंथला, मयुरी पहानपटे, विनोद नरेन्दुलवार, सिनू पांझा, अजय राठोड, आकाश गंधारे, प्रफुल घोटेकर, प्रदीप पाला, सचिन भोयर, राजु निमकर, अभिजित कोंडावार, स्वप्निल पहानपटे, मंगल चव्हाण, किशोर रागीट, राजकुमार भोगा, महेंद्र बुरडकर, महेश झाडे, सुरेश धोटे, महेंद्र उपलेंचवार, माया धोटे, उज्ज्वला जयपुरकर, शुभांगी रागीट, ममता केशेट्टीवार, सीमा देशकर, योगीता भोयर, प्रियदर्शनी उमरे, राधा विरमलवार, प्रिती रेकलवार, लक्ष्मी बिस्वास, सरीता शहा, मिरा कुलकर्णी, निलेश पुलगमकर, इंद्रपाल धुडसे, स्वप्निल अनमुलवार, निलेश संगमवार, राकेश पुन, सुहास सा. माडूरवार, मनोज नरशेट्टीवार, दिपक सा. बोनगिरवार, गणेश मेरुगवार, शिथिल लोणारे, वैभव बोनगिरवार, अश्विनी तोडासे, स्वाती वडपल्लीवार, वैष्णवी बोडलावार, कोमल फरकाडे, अरूणा जांभुळकर, शारदा गरपल्लीवार, सुरेखा श्रीकोंडावार, कलावती पुप्पलवार, मनिषा दुर्योधन, मनिषा मडावी, अस्मिता रापलवार, तेजस्वीता भगत, हरीश ढवस, विनोद देशमुख, रोशन ठेंगणे, अजय मस्के, संजय कोडापे, अमोल पाल, राहुल पाल, माधुरी मोरे, रजीया शेख, वैशाली बोलमवार, प्रभाकर भोयर, रत्नमाला भोयर, चंदु आष्टणकर, राम लाखीया, रननंज सिंह, सतीश कनकम, मिथीलेश पांडे, अमोल थेरे, विनोद चौधरी, नितू चौधरी, किरण बोढे, साजण गोहणे, धनराज पारखी, हसन शेख, सुरेंद्र भोंगळे आदिंसह जिल्हाभरातील भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते व नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.