ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवती येथील एटीएम सेवा पुन्हा सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल असलेल्या तालुकास्तरीय जिवती शहरात एकमेव चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एटीएम सेवा सुरू केली होती मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून एटीएम सेवा बंद पडल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत असुन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एटीएम सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी बँकेच्या ग्राहकांसह स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

          गेल्या २० वर्षांपासून जिवती येथे कार्यरत असलेल्या या बँकेच्या शाखेतून परिसरातील ७० हून अधिक गावांतील नागरिकांचे आर्थिक व्यवहार होतात. यामुळे बँकेत नेहमीच खातेदारांची मोठी गर्दी असते. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या एटीएम सेवेमुळे नागरिकांना पैसे काढण्यासाठी मोठी सोय झाली होती. मात्र, बँक व्यवस्थापनाने ही सेवा बंद केल्याने ग्राहकांना पुन्हा तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा वेळ वाया जात असून, त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

स्थानिक ग्रामस्थ आणि बँकेच्या ग्राहकांनी बँक व्यवस्थापनाला एटीएम सेवा तातडीने पूर्ववत सुरू करण्याची विनंती केली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल आणि त्यांचे दैनंदिन व्यवहार सुलभ होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये