ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाघाच्या हल्यात शेतकरी ठार

परिसरात दहशतीचे वातावरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत सावली तालुक्यातील विरखल परिसरात आपल्या शेतात धान पिकात निंदन करीत असतांना पांडुरंग भिकाजी चचाने रा. पाथरी या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना सकाळीच घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सावली वनपरीक्षेत्र अंतर्गत पाथरी – विरखल मार्गावरील असोला मेंढा नहराला लागून असलेल्या शेतात सकाळी निंदनचे काम करीत असतानाच वाघाने शेतकऱ्यावर हल्ला केला व शेतकऱ्याला उचलून नेऊन ठार केले. परिसरात असलेल्या लोकांनी आरडाओरड केल्यानंतर वाघाला पळ काढला.

सदर घटनेची माहिती वन परिक्षेत्र विभागाला व पोलीस विभागाला देण्यात आली असून प्रशासन घटनास्थळी पोहचले आहे. याच परिसरात वाघीनेने पिलांना जन्म दिल्याची माहिती मिळत असून विरखल परिसरात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ऐन शेतीच्या हंगामात वाघाचा धुमाकूळ सुरू झाल्याने शेतकरी भयभीत झाल्याने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ईश्वर गंडाटे यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये