ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीत पहिला श्री स्वामी समर्थ दरबार पूर्णत्वास

६ सप्टेंबर पासून प्रथम प्रवेशाला सुरुवात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा, अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी) यांच्या वतीने भद्रावती येथे चंद्रपूर ।जिल्ह्यातील पहिला श्री स्वामी समर्थ दरबार उभारण्यात आला असून त्याचे प्रवेश पूजन शनिवारी (दि. ६ सप्टेंबर २०२५) सकाळी ६ वाजता पार पडणार आहे.

या दरबाराची स्थापना अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथील परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने व आदरणीय श्री चंद्रकांत दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. दरबाराच्या प्रवेश पूजनाचा कार्यक्रम सेवेकरी व भाविकांच्या उपस्थितीत पार पडणार असून, सकाळी १०.३० पासून प्रसाद वितरण होईल, असे समस्त श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी कळविले आहे. दरबारामध्ये दररोज त्रिकाळ आरतीचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता भूपाळी आरतीनंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर तसेच भगवान शंकर पिंडीवर अभिषेक होईल. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता व संध्याकाळी ६.३० वाजता नैवेद्य आरती पार पडेल.

२० टक्के अध्यात्म आणि ८० टक्के समाजसेवा या माऊलींनी दिलेल्या संकल्पनेनुसार या दरबारातून समाजहिताच्या विविध सेवाकार्यांना चालना मिळेल. भद्रावतीतील किल्ला वार्ड, कुणबी सोसायटी, विवेकानंद माध्यमिक विद्यालयासमोर या दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या उद्घाटन सोहळ्यास भाविकांनी व सेवेकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी सेवा रुजू करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये