भद्रावती इनरव्हील क्लब भद्रावतीचा OCV भेट संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती येथील फेरीलँड स्कूल मध्ये दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी इनरव्हील क्लब भद्रावतीचा OCV भेट सोहळा उत्साहात व औपचारिकतेने संपन्न झाला. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून इनरव्हील क्लब जिल्हा अध्यक्षा रमा गर्ग उपस्थित होत्या. विशेष अतिथी म्हणून डॉ. मनोज हके, रोटरी क्लब अध्यक्ष प्रविण महाजन, सचिव विक्रांत बिसेन, सुनिल पोटदुखे, डॉ. माला प्रेमचंद, इनरव्हील क्लब माजी अध्यक्षा प्रेमा पोटदुखे आदी मान्यवर उपस्थित होते. इन्हरव्हील क्लब च्या अध्यक्षा सौं मनीषा ढोमणे
यांनी यापूर्वी राबविलेल्या सामाजिक प्रकल्पांची माहिती दिली तसेच आगामी प्रकल्पांची माहिती उपस्थितांसमोर मांडली. सचिव तृप्ती हिरादेवे यांनी त्यांचा कार्याचा आढावा दिला. कोषाध्यक्ष रश्मी बिसेन यांनी क्लब चा जमा खर्च सादर केला,क्लबच्या आयसओ वर्षा धानोरकर यांनी इनरव्हील क्लब जिल्हा अध्यक्षा सौ रमा गर्ग आणि डॉ. मनोज हके यांच्या बद्दल माहिती दिली. डॉ. मनोज हके यांच्या सहकार्याने इनरव्हील क्लब भद्रावतीने एका अपंग मुलीला व्हील चेअर भेट दिली.तसेच पर्यावरणपूरक प्रकल्प म्हणून भद्रावतीतच तयार केलेल्या सेंद्रिय कंपोस्ट खताची माहिती रुकसाना शेख यांनी दिली. व खताचे वाटप केले. रमा गर्ग यांनी
या प्रसंगी सर्व उपस्थिताना इनरव्हील क्लब बद्दल माहिती दिली. तसेच मोहीत ढोमणे या तरुणाने लिहिलेले पेन्टिंग माय ओन थॉट एक्सिस्टेन्स, हस्ताक्षर या दोन पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. या प्रसंगी वंदना धानोरकर, कीर्ती गोहणे, निरुपा भलोडिया, स्वाती चारी शुभांगी बोरकुटे, रुकसाना शेख, मनीषा फुले, पूजा महाजन, प्रतिभा मानकर, स्वरूपा पाटील, विद्या कामतवार सर्व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रेमा पोटदुखे यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वरूपा पाटील यांनी केले.