चंद्रपूर जिल्हा मच्छीमार सहकारी संघाच्या संचालक पदी दिलीप मांढरे यांची अविरोध निवड
१५ जागांपैकी १२ अविरोध, एकाची निवडणुकीत बाजी,दोघांचे नामांकन अर्ज रद्द

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
चंद्रपूर जिल्हा मच्छिमार सहकारी संघ मर्या., चंद्रपूर.नं. १०८ च्या निवडणुकीत सर्वसाधारण प्रतिनिधी, अनुसूचीत जाती/जमाती प्रतिनीधी, महिला प्रतिनिधी, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी, व भटक्या विमुक्त जाती/जमाती विशेष मागास प्रवर्ग मतदार संघातील सन २०२५-२६ ते २०३०-३१ या कालावधी साठी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणुक नियम, २०१४ च्या नियम ३२ प्रमाणे नमुद केलेले उमेदवार त्यांच्या नावासमोर नमुद केलेल्या मतदारसंघातुन त्या जागेसाठी ते एकच उमेदवार असल्याने अविरोध निवडुण आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी एस.एस.तुपट यांनी केली.
यात चंद्रपूर-बल्लारपूर तालुका बंडू हजारे,भद्रावती-वरोरा तालुका दिलीप मांढरे,कोरपना तालुका सुरेश केसुरकर, सावली तालुका एकनाथ ठाकरे,ब्रह्मपुरी तालुका यशवंत दिघोरे, सिंदेवाही तालुका यादव मेश्राम,चिमूर तालुका दिवाकर डाहारे, नागभीड तालुका सुरेश डाहारे,मुल तालुका जितेंद्र टिंगुसले,पोंभूर्णा तालुका विजय कस्तुरे,मिनाक्षी मेश्राम,महिला राखीव नंदाबाई ठाकरे व्याहाड उमेदवार संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या त्या-त्या जागांवर त्यांच्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही उमेदवार नसल्याने औपचारिकरित्या अविरोध निवडुन आले. विमुक्त जाती /भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय प्रवर्गातून घेण्यात आलेल्या निवडणुकीत धनराज सोनकर यांनी ५१ मतांपैकी ४८ मते घेऊन दोन दिग्गज नेत्यांना पराभूत केले.एकूण १५ संचालक पदाच्या जागांपैकी सर्वसाधारन प्रतिनिधी म्हणून १०, महिला राखीव २ अशा एकूण १२ प्रतिनिधींची संचालक पदी अविरोध निवड करण्यात आली.
तर विमुक्त जाती /भटक्या जमाती /विशेष मागास प्रवर्गाच्या झालेल्या सार्वत्रिक निडणुकित १ असे एकूण १३ उमेदवार निवडून आलेत.यातील २ उमेदवारांचे नामांकन अर्ज ना मंजूर करण्यात आले.या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.एस.तुपट व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून कामावर यांनी काम पाहिले.