तुकूम येथील नॅशनल कुंगफु व कराटे स्पर्धेत पोलीस कराटे क्लबच्या खेळाडूंचे नेत्रदीपक यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
तुकुम, चंद्रपूर येथे पार पडलेल्या नॅशनल कुंगफु व कराटे स्पर्धेत भद्रावती येथील पोलीस कराटे क्लबच्या खेळाडूंनी आपला नेत्रदीपक खेळ सादर करीत पाच सुवर्णपदक,पाच रजत पदक तर आठ कास्यपदक प्राप्त करीत भद्रावती शहराचे नाव उंचावले आहे. सदर स्पर्धेत जवळपास 600 स्पर्धकांनी भाग घेतला होता.
क्लबच्या नियती ढेंगे हिने कातास आणि फाईट प्रकारात रजत व कांस्यपदक प्राप्त केले, वैदही मुंडे हिने कातास व फाईट प्रकारात दोन कांस्यपदक, त्रिशा चुधरी हिने फाईट प्रकारात रजत पदक, साची चावरे हिने कातास व फाईट प्रकारात एक सुवर्ण व एक कास्यपदक, नैताफी बनपुरकर याने फाईट प्रकारात रजत पदक, ओम पचारे याने कातास व फाईट प्रकारात एक सुवर्ण व एक कांस्यपदक, शोर्धाज राय याने कातास व फाईट प्रकारात एक सुवर्ण व एक रजत पदक, ऋषिकेश मुंडे याने कातास व फाईट प्रकारात एक सुवर्ण व एक रजत पदक, जिवेश उपरे याने कातास प्रकारात एक सुवर्णपदक, विश्वराज तांगडे यांनी कातास व फाईट प्रकारात दोन कांस्यपदक तर अभी पुसांडे यांने कातास प्रकारात एक कांस्यपदक प्राप्त केले आहे.सर्व खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या प्रशिक्षकांना दिले आहे.
सदर सर्व खेळाडूंचे शहरात सर्वत्र अभिनंदन होत आहे.