ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा यांची नियुक्ती

चंद्रपूर महानगरपालिका महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक ; 10 फेब्रुवारी रोजी विशेष सभा

चांदा ब्लास्ट

शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीकरीता १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी, या निवडणुकीच्या सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांची नियुक्ती केली आहे.

महानगरपालिका आयुक्त यांनी महापौर व उपमहापौर या पदांच्या निवडणुकीकरीता विशेष सभेचा दिनांक व वेळ निश्चित करून मिळण्याबाबत विभागीय आयुक्त नागपूर यांना विनंती केली होती. सदर पदाच्या निवडणूकीकरीता विशेष सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त किंवा त्यांचा प्रतिनिधी असेल, अशी तरतूद आहे.

त्यानुसार (दि. २७) दृकश्राव्य माध्यमातून झालेल्या बैठकीतील विचारविनिमयाअंती, चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर या पदांच्या निवडणुकीकरीता १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राणी हिराई सभागृह, चंद्रपूर महानगरपालिका, चंद्रपूर येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त यांच्यातर्फे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी निर्गमित केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये