रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या वतीने १०६ दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम पायाचे मोफत वितरण

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी
जितेंद्र चोरडिया, चंद्रपूर
चंद्रपूर : रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर व ओसवाल चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ते ११ मार्च या कालावधीत पंजाबी सेवा समिती सभागृह विवेकनगर येथे १०६ दिव्यांग लोकांना मोफत प्रभा फूट लावून देण्यात आला. अपंगत्वावर मात करणाऱ्या प्रभा फुट मोफत मिळाल्याने विकलांग महिला व पुरूषांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर व ओसवाल चॅरिटेबल ट्रस्टने सर्व प्रथम ७ मार्च रोजी या शिबिरात सहभागी झालेल्या सर्व १०६ विकलांग लाभार्थ्यांच्या पायाचा माप घेतला. त्यानंतर कृत्रिम पाय तशा पध्दतीने तयार करून १० व ११ मार्च रोजी सर्व लाभार्थ्यांच्या पायाला कृत्रिम पाय फिट करून देण्यात आला. त्याच दिवशी १०६ लाभार्थ्यांना पाय लावल्यानंतर प्रत्यक्षात चालून दाखविले आणि त्यांना पायामुळे चालण्यात अडचण तर जात नाही ना याचीही माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली.
प्रभा कृतीम पाय वितरण सोहळ्याच्या समारोपीय कार्यक्रमाला मंचावर रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ.विजय आईंचवार, रोटरी क्लब अध्यक्ष संदिप रामटेके, सचिव राजेश गण्यारपवार, शरद सेठ, डॉ. मिलन निकुम, मधुसूदन रूंगठा, पंजाबी सेवा समितीचे कुक्कु सहानी, आर्थिक मदत करणारे रम्भा दोढिया, मातुश्री गडा, मंजुबेन गोसरी, कस्तुरबेन हरिया, कल्पनाबेन जीवराज, जिग्ना जीवराज, मंजुलाबेन हरिया, कांचनबेन हंसराज उपस्थित होते. याप्रसंगी या प्रकल्पासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचा स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. साधारणत: १३ ते १५ लाख रुपये या प्रोजेक्टला खर्च झालेले आहेत. या प्रोजेक्टचे प्रोजेक्ट डायरेक्टर्स.अजय मार्कंडेवार, समीर तातावार, जितेंद्र जनबंधू,.मनीष बोराडे होते. या चारही प्रोजेक्ट डायरेक्टरनी प्रकल्प यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला माजी अध्यक्ष मधुसूदन रूंगठा, रवींद्र जैन, महेश उचके, पांडूरंग आंबटकर, इनरव्हील क्लब अध्यक्ष अर्चना उचके, ज्योती रामटेके, अनुप यादव, विशाल खांंडरे, स्मिता जीवतोडे, अशोक हासानी, जितू दोशी, प्रदीप बुक्कावार, अविनाश उत्तरवार, मिलिंद बोडखे, संजय ठवस, नविन चोरडिया, नरेंद्र बुरांडे, अभय झाडे यांच्यासह रोटरी क्लबच्या सदस्यांनी सर्व प्रकारची मदत केली.



