आपात्कालीन प्रतिसाद प्रणाली डायल ११२ चा दुरउपयोग करणे चांगलेच भोवले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा पोलीस दला मार्फत संपुर्ण वर्धा जिल्हयात आपात्कालीन प्रतिसाद प्रणाली डायल 112 राबवण्यात येत आहे. सदर प्रणाली वर आपात्कालीन परीस्थीती मध्ये नागरीकांना मदत तात्काळ पोहचवणे तसेच नागरीकाची सुरक्षा व शहराची सुव्यवस्था अबाधित राखणे पोलीसांचा उददेश आहे. दि. 13.03.2026 रोजी डायल 112 नियंत्रण कक्ष येथे कॉल प्राप्त झाला कि, देवळी रत्नापुर या पत्यावर कॉलरचे वाहणाला धडक दिली असुन धडक देणारे पाहणामध्ये तिन लोक असुन त्याचे कडे बंदुक सुदधा आहे व त्या बंदुकिने कॉलरच्या दिशेने फायर सुदधा करण्यात आला असुन गोळी झाडाला लागली आहे. व ते तिन लोक यवतमाळ च्या दिशेने पळुण गेले आहे. असा कॉल प्राप्त होताच 15 सेंकद मध्ये पोलीस स्टेशन देवळी ला कॉल डिस्पॅच करण्यात आला. व याबाबत लगेच ठाणेदार देवळी व उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव यांना सुदधा माहीती देण्यात आली. घटनेचे गांर्भीर्य ओळखुन देवळी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले व शहानिशा केली असता अशी कोणतीही घटना किवा प्रकार झाल्या नसल्याचे निष्भण झाले. याबाबत कॉलर/तकार नामे महेश सतिश जुमळे याला कॉल बाबत विचारपुस केले असंता मि घटनास्थळावर येवु शकत नाही असे उडवाउडवीचे उत्तर देत होता.
पोलीसांनी कॉलर महेश सतिश जुमळे यांचा शोध घेतला असता नमुद इसम हा कानगाव येथे होता त्याला पोलीस भेटले नमुद इसम हा दारूच्या नशेत होता. त्याला विचारपुस केले असता मि असाच कॉल केल्या असल्याबाबत सांगत होता. त्यामुळे पोलीसांची खात्री झाली कि, कॉलरने खोटा कॉल करूण पोलीस प्रशासनाची दिशाभुल करूण शास्त्तनाने उपलब्ध करूण दिलेल्या सोईचा व साधनाचा दुरुउपयोग केलेला आहे. सदर इसमाने डायल 112 वर कॉल करूण दिलेली घटना घडलेली नसुन त्यांने फक्त पोलीस प्रशासनास त्रास व्हावा या उद्देशाने खोटी माहीती दिलेली आहे तसेच आरोपीने आपल्या कायदेशिर हक्काचा गैरवापर करूण कर्तव्य बजावण्यारे लोकसेवकाला डायल 112 कमाक वर खोटी माहीती दिल्यावरूण पोलीस स्टेशन देवळी अपराध कमांक 148/2026 कलम 217 ना.न्या. स. सह कलम 85 म.दा.का. अन्वये गुन्हा नोद करण्यात आला. पुठिल तपास देवळी पोलीस करीत आहे.
सर्व नागरीकांना आव्हाण करण्यात येते कि, आपात्कालीन परीस्थीती मध्ये झालेल्या घटने बाबत कॉल करावे खोटे कॉल चुकिची माहीती दिल्यास त्याचे वर योग्य कादेशिर कार्यवाही करण्यात येईल यांची नोंद घ्यावी
(सौरभ कुमार अग्रवाल भा.पो.से.) पोलीस अधिक्षक वर्धा
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल (भा.पो.से.), मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव डॉ वंदना कारखेले यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल मडालकर ठोणदार देवळी, सहा. पोलीस निरीक्षक संदिप कापडे पोउपनि युवराज जाधव व देवळी पोलीस यांनी केली.



