ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनैशा वाहन चालक संघटनेतर्फे हरदोना खुर्द येथील प्राथमिक शिक्षकांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गणराज्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हरदोना खुर्द येथे भारतीय गणराज्य दिनाचे औचित्य साधून सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ ला विविध सांस्कृतिक कार्यक्रमत अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या वतीने शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

सदर प्रसंगी घेण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सुरूवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रामपंचायत उपसरपंच एकनाथ मुठ्ठलकर आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोरेश्वर मुटलकर यांच्या अध्यक्षतेखाली तंटामुक्त अध्यक्ष महादेव वाटेकर,ग्रामपंचायत उपसरपंच एकनाथ मुठलकर, संघटनेचे अध्यक्ष सुरजभाऊ उपरे, महाराष्ट्र सल्लागार अशोककुमार उमरे, मुख्याध्यापक सुधाकर जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा मेघश्याम बोबडे,मीराबाई उद्धव कोडापे शाळा समिती सदस्या छाया दिलीप घोरपडे, सुष्मा किशोर गोहोकार,आशा विनोद देवेकर,करिष्मा दीपक कोडापे इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी मुख्याध्यापक सुधाकर जाधव, शिक्षक नरेश मंडोगडे, मनीष मंगरूळकर, शिक्षिका तृप्ती टिकले, एन. सी. एफ. पुस्तक परी संजिवनी पेरगार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोरेश्वर मुटलकर, अंगणवाडी सेविका इंदिराताई टोंगे, ज्योत्स्ना माहुरे इत्यादींचा अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

सदर प्रसंगी अनैशा वाहन चालक कामगार संघटना हरदोना खुर्द महाराष्ट्र राज्य एन.जी.पी. ५७३३ चे संस्थापक अध्यक्ष सुरजभाऊ उपरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आणि वाहन चालक संघटनेचे महाराष्ट्र राज्य सल्लागार अशोककुमार उमरे, युवा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर चंपतभाऊ राजुरकर आणि संघटना कार्यकर्ते संजय साळवे, प्रमोद देवेकर, आकाश ताकसांडे, अविनाश उपरे इत्यादी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सदर प्रसंगी उपस्थित होते.

गणराज्य दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत शाळेतील विद्यार्थ्यांनी फार मनमोहन नृत्य सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांना गावातील मंडळींकडून प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला गावातील लहान थोर मंडळीनी फार मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये