प्रजासत्ताक दिनी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ सन्मानित
जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
समाजातील विविध घटकांसाठी आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचा आज प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला.
पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेशी संलग्नित बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून वर्ष २०२५-२६ या कालावधीत पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसह समाजातील विविध घटकांसाठी आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात कौतुकास्पद कार्यक्रम व उपक्रम राबविले.
तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाच्या मिशन परिवर्तन अंतर्गत बुलढाणा जिल्हा नशामुक्त व्हावा म्हणून नशामुक्तीवर आधारित विशेष कार्य केल्या केल्याबद्दल बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाला प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी आमदार संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजितसिंह राजपूत यांच्यासह वरिष्ठ पत्रकार नितीन शिरसाट, चंद्रकांत बर्दे, राजेश डिडोळकर, मृणाल सावळे, वसीम शेख अन्वर, युवराज वाघ, जितेंद्र कायस्थ, रविंद्र गणेशे, दीपक मोरे, संतोष लोखंडे, सुनिल मोरे, अजय राजगुरे, रहमत अली, विलास खंडेराव आदी उपस्थित होते.



