ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

व्यावसायिक शिक्षण व उद्योजकता तालुका स्तरीय कार्यशाळा संपन्न

पंचायत समिती(शिक्षण विभाग) कोरपना चे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘व्यावसायिक शिक्षण व उद्योजकता शालेय समग्र शिक्षण अंतर्गत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांमध्ये करिअर मार्गदर्शन, कौशल्याधिष्ठित शिक्षण, उद्योजकता विकास व रोजगाराभिमुख दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने दोन दिवसीय कार्यशाळा होली फॅमिली स्कूल, गडचांदूर येथे आयोजित करण्यात आली.कार्यशाळेत तालुक्यातील माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले.

शिक्षणात आता व्यावसायिक अभ्यासक्रमांवर भर वाढविला जाणार आहे. त्यासाठी करिअर गायडन्स हॅन्डबुक आणि माय करिअर अॅडव्हायझर अॅप हे दोन नवे उपक्रम हाती घेण्यात आले आहे. त्यांची माहिती प्रत्येक शिक्षकापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर व पंचायत समिती कोरपना च्या वतीने दोन दिवसीय तालुका स्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

कार्यशाळेत व्यावसायिक शिक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अभ्यासक्रम समन्वय, स्थानिक उद्योगांशी संलग्नता, विद्यार्थ्यांसाठी करिअर नियोजन, कौशल्य विकास उपक्रमांची आखणी तसेच उद्योजकता संवर्धन या विषयांवर तज्ञ मार्गदर्शक फैयाज शेख,प्रशांत धाबेकर, सलमा कुरेशी यांनी सखोल मार्गदर्शन केले.आयोजित या उपक्रमामुळे व्यावसायिक शिक्षण व उद्योजकता विषयक उपक्रमांना अधिक गती मिळेल, तसेच विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअर संधींबाबत सक्षम मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.

आयोजित कार्यशाळा ही पंचायत समिती कोरपना चे गटशिक्षणाधिकारी कल्याण जोगदंड यांच्या मार्गदर्शनात आणि सोनुर्ली केंद्राचे केंद्रप्रमुख विलास देवाळकर, पंढरीनाथ मुसळे यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये