ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जागतिक सर्प दिनानिमित्त चिचीर्डी येथे सर्प जनजागृती कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     जागतिक सर्प दिनाचे औचित्य साधून सार्ड संस्था आणि पर्यावरण संवर्धन व विकास समिती (महा) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चिचीर्डी (ता. भद्रावती) येथे विद्यार्थ्यांसाठी सर्प जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचा उद्देश सापांविषयी भीती दूर करणे, समज व गैरसमज दूर करणे, विषारी व बिनविषारी साप यामधील फरक स्पष्ट करणे तसेच सर्प दंशानंतर करावयाचे प्राथमिक उपचार याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शामलता प्रमोद बनसोड मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून वनविभाग भद्रावतीचे क्षेत्र सहाय्यक अधिकारी श्री. विकास शिंदे सर उपस्थित होते.

या वेळी सर्पमित्र व वन्यजीव रक्षक श्रीपाद बाकरे व अनुप येरणे यांनी सापांविषयी समज-गैरसमज, सापांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. सर्पदंश झाल्यानंतरची लक्षणे आणि प्राथमिक उपचार यावर सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमात नूतन लेडांगे यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच सार्ड संस्थेचे सदस्य आशिष चाहकटे, शैलेश पारेकर, लोकेश दुदुरे, प्रथमेश पुल्लारवार, राहुल खोडे, साहिल कुचेकर, वैभव निंबाळकर व शुभम मूरकुटे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवला.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांविषयी आदर, संरक्षणाची भावना व आपत्कालीन परिस्थितीत सजगता निर्माण झाली, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये