आ. जोरगेवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत दिली राजकिय परिस्थीतीची माहिती
मुंबई येथे भेट, सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीबाबत आमदार किशोर जोरगेवार आणि चिमूर मतदारसंघाचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील वर्षा बंगल्यावर भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी चंद्रपूरातील सद्यस्थितीची सविस्तर माहिती त्यांनी मुख्यमंर्त्यांना दिली.
या भेटीदरम्यान परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून चंद्रपूर शहर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू ठेवण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्याची माहिती आहे
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन्ही पक्षांना स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने सध्या दोन्ही पक्षांकडे सत्ता स्थापनेची समान संधी आहे. या दिशेने दोन्ही पक्षांकडून हालचाली सुरू असून, सत्ता स्थापनेसाठी विविध राजकीय समीकरणे जुळवली जात आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीनंतर चंद्रपूरच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षालाही सत्ता स्थापनेची पूर्ण संधी असून, राज्याच्या सर्वांगीण विकासासह चंद्रपूर शहराच्या विकासाला गती देण्यासाठी महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आणण्याचे प्रयत्न अधिक प्रभावीपणे करण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेटी दरम्यान दिल्या आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सुमारे ३० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात आणली असून तसा करार केला आहे. या गुंतवणुकीतून चंद्रपूरातील स्टील उद्योगालाही चालना देण्यात येणार असून, त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था भक्कम होईल आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



