आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने निःशुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणी
श्री माता कन्यका सेवा संस्था चंद्रपूर व शालीनीताई मेघे हॉस्पीटल व रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने

चांदा ब्लास्ट
माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील बल्लारपूर येथे दि. २०.०७.२०२५ रोजी स. १२ ते सांय. ५ वाजे पर्यंत विजयालक्ष्मी प्राथमिक शाळा, कन्न्मवार वार्ड, बल्लारपूर या ठिकाणी निःशुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन श्री माता कन्यका सेवा संस्था चंद्रपूर व शालीनीताई मेघे हॉस्पीटल व रिसर्च सेंटर नागपूरच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरातील तपासणीमध्ये ज्यांना दृष्टीदोष आढळून आला त्यांच्यावर नागपूर येथे शालीनीताई मेघे हॉस्पीटलमध्ये शस्त्रक्रिया होणार आहे.
या शिबिराचा रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहान आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्फत श्री माता कन्यका सेवा संस्था, चंद्रपूर व शालीनीताई मेघे हॉस्पीटल व रिसर्च सेंटर नागपूरच्यावतीने कळविण्यात आले आहे. आता पर्यंत वेगवेगळया ठिकाणी निशुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणीचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरांचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला आहे.
रूग्णांनी मानले आ. मुनगंटीवार यांचे आभार
शिबिरात सहभागी झालेल्या रूग्णांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे. तपासणी, मार्गदर्शन व शस्त्रक्रिया निःशुल्क उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. आतापर्यंत मुनगंटीवार यांनी ३५ हजारांवर नागरिकांवर मोफत चश्मे वितरीत केले व १५ हजारांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.