
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलिस स्टेशन हिंगणघाट परिसरातील दारु विक्रेता नामे अजय अवलचंद पवार रा. दहेगाव (कुंभा) ता.राळेगाव जि. यवतमाळ ह.मु खैराटी पारधी बेडा ता.हिंगणघाट जि.वर्धा व फरार आरोपी नामे सुनिल भोसले रा.खैराटी पारधी बेडा हिंगणघाट हे त्यांचे T.V.S जुपीटर मोपेड गाडी क्रमांक MH-32-AR-9574 ने गावठी मोहा दारुची वाहतुक करुन धोबी घाट रोडने गाडगेबाबा वार्ड येथे जात आहे.
अशी माहीती झाल्याने अशा प्राप्त माहीती वरून पोलीस स्टेशन हिंगणघाट पथकातील पो.हवा.सुनिल मळनकर,पो.ना.विनोद येवले पो.शी.सुशिल सायरे,पो.शि.रविद्र आडे यांनी धोबी घाट गाडगेबाबा वार्ड रोडवर नाकेबंदी करुन सदर दारु वाहतुक करणारा इसम नामे अजय अवलचंद पवार व (फरार) आरोपी सुनिल भोसले रा.खैराटी पारधी बेडा याचे वर कार्यवाही केली असता सदर इसम त्याचे T.V.S जुपीटर मोपेड गाडी क्रमांक MH-32-AR-9574 वर 10 प्लास्टीकचे पन्नी गोळ्यामध्ये 100 लिटर गावठी मोहा दारु वाहतुक करीतांना मिळुन आल्याने आरोपीचे ताब्यातुन वाहन व गावठी मोहा दारुचा माल असा एकुण 70,000 रु चा माल मिळुन आल्याने आरोपीचे ताब्यातुन जप्त करुन आरोपीतांविरुद्ध पो.स्टे हिंगणघाट येथे दारु बंदी कायद्यान्वेय गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री.अनुराग जैन, मा.उप.विभागिय पोलीस अधिकारी हिंगणघाट श्री रोशन पंडीत यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्री.देवेद्र ठाकुर पो.स्टे हिंगणघाट यांचे नेतुत्वात वरील प्रमाणे पोलीस स्टेशन हिंगणघाट पथकातील पोलीस अमंलदार यांनी केली वर्धा फैमोद्दीन शेख