
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जन्मदात्या बापाला मुलाने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना देऊळगाव राजा येथील समता कॉलनी येथे 15 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. सविस्तर वृत्त असे की,
देऊळगाव राजा येथील समता नगर येथे वडील प्रभाकर श्रीराम हेलोडे यांनी मुलगा विशाल प्रभाकर हेलोडे यास म्हणाले की, तु घरी चल या कारणावरून प्रभाकर याने वडिलास चापटा बुक्यांनी तसेच हमालीचे हुक ने मारहाण करून जख्मी केले व जिवे मारण्याची धमकी दिली. घटनेची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपी प्रभाकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उप निरिक्षक नारायण गिते करीत आहे.