ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
रवींद्र शिंदे आणि वासुदेव ठाकरे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

चांदा ब्लास्ट
वरोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे आणि त्यांचे सहकारी वासुदेव ठाकरे यांनी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार किर्तिकुमार भांगडिया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार संजय देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पक्षाच्या जनहिताच्या धोरणावर विश्वास व्यक्त केला.