ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक

आस्थापनांवर मनपा करणार कारवाई  

चांदा ब्लास्ट

शहरातील मोठ्या इमारती, मॉल, दवाखाने, हॉटेल यांना शासनाच्या अन्य परवानगीसह अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. अग्निशमन यंत्रणेद्वारे मालमत्ता व जीवित हानी टाळता येते,मात्र शहरातील अनेक आस्थापना अश्या गंभीर बाबीकडे कानाडोळा करत असल्याने मनपाद्वारे अश्या आस्थापनांवर कारवाईची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

    महाराष्ट्र अग्निशमन प्रतिबंधक कायदा 2006 व 2009 तरतुदीनुसार आग लागू नये, यासाठीची उपाययोजना करण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनेच्या मालकाची आहे. दर 6 महिन्यांनी त्याने ‘फायर ऑडिट’ करणे सुद्धा आवश्यक आहे. फापर सेफ्टी अॅक्टनुसार ज्या इमारतींची उंची 15 मीटर अथवा त्याच्यापेक्षा जास्त उंच आहे तसेच ज्या व्यावसायिक प्रतिष्ठानाचे बांधकाम 150 चौ. मी. पेक्षा अधिक आहे अशा सर्व इमारतींना अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. यात मोठ्या संख्येने नागरिक जमा होण्याची शक्यता असलेले तारांकित हॉटेल्स, लॉजिंग व बोर्डिंग, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, नाट्यगृह, प्रदर्शन सभागृह, एलपीजी गोडावून, फटाका शॉप, बहुमजली इमारती, रुग्णालये इत्यादींचा समावेश आहे.

   शहरात एप्रिल 2024 पासुन ते आतापर्यंत व्यावसायिक आस्थापनांना आग लागण्याच्या 25 घटना घडलेल्या आहेत. यात सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. मात्र यापुढेही होवू नये यासाठी अग्निशमन यंत्रणा महत्वाची आहे. मागील वर्षी एकुण 33 आस्थापनांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते यापैकी 26 ऑनलाईन पद्धतीने देण्यात आले. तर 2025-26 या आर्थिक वर्षात 458 आस्थापनांना अग्निशमन यंत्रणा बसवुन पालिकेकडून प्रमाणपत्र घेण्यासंबंधी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तपासणीत अग्निशमन यंत्रणा आढळून न आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

ऑनलाईन ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध –

सदर प्रमाणपत्र हे ऑनलाईन घेता येणार असुन यासाठी rts.cmcchandrapur.com या वेबसाईट नोंदणी करून अर्ज करता येतो. नियमानुसार, ना हरकत प्रमाणपत्र अग्निशमन विभागातून त्याच अधिकृत एजन्सीद्वारे मिळते.

आवश्यक कागदपत्रे –

अर्ज ‘अ’ करीता

1) अर्ज

2) मालकी हक्काचे पुरावे

3) बांधकाम नकाशा

4) अग्नि सुरक्षा यंत्रणेचे तपशील

5) बांधकाम परवानगी

6) स्ट्रक्चर सेफ्टी सर्टिफिकेट

7) एजन्सी धारकाचे समती पत्र

8) घर टॅक्स पावती चालू वर्षाची

9) नळ टॅक्स पावती चालू वर्षाची

अर्ज ‘ब’ करीता

1) अर्ज

2) मालकी हक्काचे पुरावे

3) अग्नि सुरक्षा यंत्रणेचे तपशील

4) स्ट्रक्चर सेफ्टी सर्टिफिकेट

5) एजन्सी धारकाचे समती पत्र

6) घर टॅक्स पावती चालू वर्षाची

7) नळ टॅक्स पावती चालू वर्षाची

रुग्णालये, मॉल, चित्रपटगृहे, बहुमजली इमारत आदी ठिकाणी अग्निशामक यंत्रणा असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्राथमिक स्वरुपातील आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. लहान दवाखाने, दुकाने, कार्यालये यांनीही फायर सिलिंडर वापरणे गरजेचे आहे.प्रमाणपत्र घेण्यास मनपाकडून अर्ज करण्याची ऑनलाईन सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे – राहुल पंचबुद्धे ,प्रभारी अग्निशमन विभाग प्रमुख, चंद्रपूर महानगरपालिका

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये