ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजपच्या विजयाने मुल-बल्लारपूर शहराचा चेहरामोहरा बदलणार _आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विजयी संकल्प सभेत व्यक्त केला विश्वास

शहराचा विकास गतीने पुढे नेण्यासाठी भाजपाला साथ द्या

चांदा ब्लास्ट

मुल आणि बल्लारपूरमध्ये उमेदवारांच्या प्रचारार्थ अभिनेत्री रिंकू राजगुरूंची उपस्थिती

बल्लारपूर आणि मुल सभेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चंद्रपूर :_ मुल आणि बल्लारपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छ पाणी, मजबूत रस्ते, घरपट्टे, सर्वांसाठी घरकुल आणि उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा आमचा ठाम संकल्प आहे. भाजपाचे नगराध्यक्ष आणि प्रभागातील उमेदवारांना आपण विजयी केल्यास पुढील पाच वर्षांत शहरासाठी निधीची कोणतीही कमतरता राहणार नाही. वैशिष्ट्यपूर्ण योजना, नगरोत्थान योजना, आदिवासी व दलित वस्ती सुधार योजना, डीपीडीसी, खनिज विकास निधी आणि आमदार निधी यांच्या माध्यमातून या क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्याचे काम आणखी वेगाने आणि भक्कमपणे राबवले जाईल,” अशी ग्वाही राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मुल नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रा. डॉ. किरणताई कापगते आणि बल्लारपूर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रेणुकाताई दूधे यांसह सर्व मुल आणि बल्लारपूर प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारार्थ मुल येथील गुजरी चौक आणि बल्लारपूर येथील गांधी चौकात आयोजित भव्य विजयी संकल्प सभेत जनतेला संबोधित करताना ते बोलत होते.

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ज्या प्रभागामध्ये भाजपचे उमेदवार निवडून येईल तो प्रभाग विकासात नंबर वन राहील. काँग्रेसवाल्यांना संधी देणे म्हणजे संधीची माती करणे होय. मुलमध्ये भाजपची सत्ता आली नाही तर पुढील पाच वर्ष या प्रभागाचा व शहराच्या विकासाला ब्रेक लागेल. मी मूल आणि बल्लारपूर क्षेत्राचा आमदार आहे, त्यामुळे या नगराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. मूल आणि बल्लारपूरच्या विकासासाठी जनतेने भाजपचे नगराध्यक्ष आणि प्रभागातील उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.

जनतेची एक चूक पाच वर्षे भोगावी लागू शकते. काँग्रेसची सत्ता आली तर नगरपरिषदेची तिजोरी भरणार नाही उलट कराचा भार येथील नागरिकांवर वाढेल. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. पुढील पाच वर्ष निधीचा वर्षाव होत राहील.

आमदार श्री. मुनगंटीवार यांनी विकासकामांची यादी जनतेपुढे ठेवत, भाजपला पाठिंबा दिल्यास तुमचा प्रभाग विकासात नंबर वन करेल, पण एक चुकीचा निर्णय संपूर्ण शहराला पाच वर्षे मागे नेऊ शकतो, असा संदेश दिला.

यावेळी सैराट चित्रपटातील अभिनेत्री आर्ची (रिंकू राजगुरू) म्हणाल्या, आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या कार्यकाळात क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. त्यांच्या भाषणातून मला या विकासकामांची दूरदृष्टी जाणवली. आता येथील उमेदवारांना भक्कम विजय मिळवून देण्यासाठी आपण आपल्या मत रूपी आशीर्वादाने देण्याचे आवाहन त्यांनी केले.

मुल आणि बल्लारपूर येथे उभारणार भव्य विवाह मंडपम्

गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर मुला-मुलींच्या लग्नाचा मोठा आर्थिक बोजा येतो. या समस्येची जाणीव ठेवून, भाजपा सत्तेत आल्यास बल्लारपूर आणि मुल शहरात तब्बल २ एकर जागेत ₹५ कोटींचे अत्याधुनिक ‘विवाह मंडपम्’ उभारण्यात येईल.या मंडपात विवाह कार्यक्रम फक्त ५०१ रुपयात मध्ये पार पाडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर आणि मुल येथील जाहीर सभेत व्यक्त केला.हा मंडप केवळ इमारत नसेल, तर समाजातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठा दिलासा आणि प्रतिष्ठेने लग्न करण्याचा आत्मविश्वास देणारा प्रकल्प असेल.

मुल तालुक्याचा बहुआयामी विकास:

मुल इको पार्क, सिमेंट रस्‍ते, स्‍टेडियम, जलतरण तलाव, आदिवासी होस्‍टेल, जीम, पत्रकार भवन, नाटयगृह, डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती, कृषी महाविद्यालय, पाणीपुरवठा योजना, बस स्‍थानक, महात्‍मा ज्‍योतीबा फुले आठवडी बाजार, माळी समाज सभागृह, तेली समाज सभागृह, स्‍मशानभुमी, मुस्‍लीम समाज कब्रस्‍थान, छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल, १०७ कोटीचे ग्रामीण रूग्‍णालय, पॉलीटेक्‍नीक कॉलेज, बायपास, पोलिस स्‍टेशन, सर्वांना पट्टे वाटप,चिंचाळा सिंचन प्रकल्‍प, विश्रामगृह, उपविभागीय अधिकारी कार्यालय, पट्टे वाटप, योगा भवन, ग्रामीण रूग्‍णालय, MIDC मुल, सुंदर शाळा, सभागृह, आरोग्‍य शिबीर, नेत्र चिकीत्‍सा शिबिर, कोविडमध्‍ये मदत.

बल्लारपुर शहरातील विक्रमीविकास कामे

अत्याधुनिक सैनिक शाळा, स्टेडियम, तहसील कार्यालय, एसडीओ कार्यालय, स्टेडियम, बॉटनिकल गार्डन, एसएनडीटी महिला विद्यापीठाचे उपकेंद्र, बस स्थानक, नाट्यगृह, स्मार्ट आयटीआय, पोलीस स्टेशन, स्व. सुषमा स्वराज यांच्या नावाने महिला सक्षमीकरण केंद्र, ईएसआयसी ओपीडी केंद्र, कॉलरी मैदान येथे स्टेडियम, सास्ती पुलाचे बांधकाम, स्व. विपिन रावत यांच्या नावाने जिम, पट्टे वाटप, सिमेंट रस्ते, पाणीपुरवठा योजना, सोलर ट्यूबवेल, 33 केव्हीचे विद्युत केंद्र, ऑटोरिक्षा स्टँड, व्हाॅलीबॉल कोर्ट, वस्तीगृह, छटपूजा घाट, गणपती घाट, डिजिटल शाळा, महात्मा गांधी व्यापार संकुलाचे आधुनिकीकरण, रेल्वेमार्फत लाईफ लाईन एक्सप्रेसच्या माध्यमातून रुग्णसेवा, आरोग्य शिबीर, नेत्रचिकित्सा शिबिर, वाचनालय, जलतरण तलाव,उत्तम आरोग्य सुविधेसाठी ग्रामीण रुग्णालयात सिटीस्कॅन, एमआरआय मशीन बसवण्यात येत आहे. नगरपरिषदेची नवीन इमारत तसेच 37 कोटी रुपये खर्च करून न्यायालयाची प्रशस्त इमारत उभी राहत आहे.

खोट्या भूलथापांना बळी पडू नका

बल्लारपूर शहराचा खरा विकास हवा असेल, तर जात-पात आणि खोट्या आश्वासनांच्या जाळ्यात अडकू नका. केवळ जातीय विचारांवर मतदान केले, तर शहराचे भविष्य अंध:कारमय होईल. विकासाची कामे डोळ्यासमोर ठेवून सुयोग्य निर्णय घ्या, तसेच विकास थांबवणाऱ्या जातीय राजकारणाला नकार द्या,असे आवाहन आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये