पुसद येथील कार्यकर्त्याचा परसबाग अभ्यास दौरा
वसंतराव नाईक परसबाग भेट व चर्चा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
नागपूर : सारख्या शहरात श्रीपतभाऊ राठोड. आणि संपूर्ण परिवाराच्या परिश्रमातून वसंतराव नाईक व सुधाकर नाईक यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वसंतराव नाईक परसबाग ही इमारतीच्या चौथ्या मजल्यावर साकारलेली आहे. हंगामानुसार येणारी जीवनाश्यक सर्व प्रकारची भाजीपाला पिके,फळे शंभर टक्के जैविक पद्धतीने घेवून आरोग्यदायी जीवन जगतात.वसंतराव नाईक
*परसबागेची काही खास उपलब्धीपूर्ण वैशिष्ट्ये,*आहेत
ताजा आणि विषमुक्त आरोग्यदायी भाजीपाला नियमित मिळतो.
विविध प्रकारची फळे (लिंबू,पेरू,पपई,चिकू,सिताफळइत्यादी फळे.)
धान्य,वेल,रुट,पाला,शेंग,फळ, ! वर्गीय उत्पादनाचा समावेश आहे.
रानभाज्या वनस्पती औषधी लागवड आहे.
परागी करणासाठी मधमाशा व फुल पाखरांचा वावर असतो.
पक्षांची स्वंयनिर्मित घरटी व अंडी,पिल्ले निर्मिती प्रक्रिया चालत राहते.
परसबागेतून निघणाऱ्या पालापाचोळ्यापासून मटका खताची निर्मिती.
जिवामृत व गोकृपाअमृतचा उपयोग. आरोग्यदायी काढ्याची निर्मिती.
एका वेळी चार लोकांना फिरण्याची,योगाची सुविधा, खड्यांपासूनचे अॅक्युप्रेशर पाईंट.
प्राणवायू झोनची निर्मिती.
३० ते ४० लोकांची प्रशिक्षण सुविधा.
५ ते ७ लोकांसाठी विशेष अंबेला गोल चर्चासत्र व्यवस्था..
संगीत उपचार केंद्र.
फलक लेखन,कचरा पेटीद्वारे संदेश देण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम.
इत्यादी अनेक वैशिष्ट्ये असून भविष्यातील समाजोपयोगी प्रकल्पासाठी राठोड परिवार सदैव तत्पर असते हे विशेष.
राठोड परिवारातील दोन्ही मुली कु.दिपाली व कु.अंजली राठोड यांनी इंग्रजीतील वसंत बहार पुस्तकाचे लेखन व प्रकाशन केले असून आरोग्यदायी परसबागेवरील त्यांचे सादरीकरण प्रेरणादायी व दिशादर्शी आहे.केंद्रीय मंत्री मा.नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतील ऍग्रो व्हिजन मध्ये मागील चार वर्षापासून सादरीकरण,ऍग्रो व्हिजन व ज्ञानप्रकाश लोकसंस्थेद्वारा ‘गच्ची वरील परसबाग कार्यशाळा, ही वसंतराव नाईक परसबागेत मागील दोन वर्षापासून सशुल्क घेण्यात येते.
वसंतराव परसबागेला अनेक क्षेत्रातील मान्यवर,अधिकारी,बचतगट सदस्य,अनेक जिल्हयातून विविध अभ्यास दौरे,कृषि अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्याची अभ्यास भेट या सारख्या नोंद घेता येईल अशा बाबी आहेत.
अशा उपयोगी,प्रेरणादायी,दिशादर्शी वसंतराव नाईक परसबागेला पुसद तालुक्यातील मा.जि.प. सदस्य व धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते रामराव चव्हाण यांच्या नेत्रत्वात डॉ.स्व. रामराव महाराज फेडरेशनचे प्रचारक तसेच बाबासाहेब कृषी विज्ञान केंद्र, हुडीचे अध्यक्ष विजय राठोड,पुसद तालुक्यातील वारकरी सांप्रदायाचे सुप्रसिद्ध किर्तनकार भारत घोगरे महाराज सोबत शेतकरी व युवा कार्यकर्ते यांच्यासह वसंतराव नाईक परसबागेचा अभ्यासदौरा यशस्वीरित्या संपन्न झाला.
श्रीपतभाऊ राठोड आणि परिवाराने साकारलेला वसंतराव नाईक परसबाग प्रकल्य वसंतराव नाईक साहेबांच्या कार्याचे स्मरण करुन देतो,त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांच्या संकल्पनेतील जलक्रांतीवरील राठोड परिवाराचे कार्य दखलपात्र असून शेतकरी विकास अभियानद्वारे ते जैविकक्रांतीसाठी धडपडत असतात हे आवर्जून उल्लेख करण्यासारखे आहे.



