ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बिबी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी संपन्न ; ६९ प्रतिकृतींचे सादरीकरण

गट विकास अधिकारी श्रीकांत बोबडे यांच्या हस्ते उद्घाटन ; बक्षीस वितरण सोहळ्यात गुणवंतांचा गौरव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर :_ विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासह संशोधनवृत्ती आणि सर्जनशीलतेला चालना देण्याच्या उद्देशाने पंचायत समिती, कोरपना यांच्या वतीने आयोजित ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन गटविकास अधिकारी श्रीकांत बोबडे यांच्या हस्ते एकलव्य इंग्लिश स्कूल तथा ज्युनिअर कॉलेज, बिबी येथे उत्साहात झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी माधव चिंतमवाड होते. प्रदर्शनीत प्राथमिक विभागातील ५० आणि माध्यमिक विभागातील १९ अशा एकूण ६९ विज्ञान प्रतिकृती सादर करण्यात आल्या.

यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी कल्याण जोगदंड, लोकनाथ खंडारे, सर्व केंद्रप्रमुख, विविध शाळांचे मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित प्रतिकृती व प्रयोग सादर करून आपली कल्पकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रदर्शित केला. यासोबत दोन प्रयोगशाळा आणि तीन प्रयोगशाळा परिचरांचाही सहभाग होता.

       बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी विस्तार अधिकारी कल्याण जोगदंड होते. तर बक्षीस वितरक म्हणून एकलव्य इंग्लिश स्कूल तथा ज्युनिअर कॉलेज, बिबीचे संस्थापक प्रा. आशिष देरकर उपस्थित होते. यावेळी जिल्हा विज्ञान मंडळाचे प्रशांत धाबेकर, केंद्रप्रमुख पंढरी मुसळे, जय महल्ले, पिंटू उपरे, प्राचार्य नितेश शेंडे आणि विठ्ठल टोंगे उपस्थित होते.

बालवैज्ञानिक प्रदर्शनातील विजेते

उच्च प्राथमिक विभागातील आदिवासी गटात अन्वया कैलास कुचणकर (पी. एम. श्री उच्च प्राथमिक शाळा, वडगाव), दिव्यांग गटात यश मोरेश्वर पेंदोर (जि. प. उच्च प्राथमिक शाळा, नांदा) आणि गैरआदिवासी गटात प्रथमेश प्रशांत धाबेकर (अंबुजा विद्यानिकेतन, उपरवाही) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. गैरआदिवासी गटात अनुश्री अनिल वांढरे (जि. प. हायस्कूल, उपरवाही) द्वितीय, तर एकांश रामटेके (आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल, गडचांदूर) तृतीय आला.

माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात दिव्यांग गटातून सुजल राजेंद्र देरकर (एकलव्य इंग्लिश स्कूल तथा ज्युनिअर कॉलेज, बिबी), आदिवासी गटातून आशिष नारायण हिवरकर (आश्रमशाळा, कोरपना) आणि गैरआदिवासी गटातून जिज्ञासा देवाळकर (होली फॅमिली पब्लिक स्कूल) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. गैरआदिवासी गटात यशवंत काळे (आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल, आवाळपूर) द्वितीय, तर गौरी खडसे (आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल, गडचांदूर) तृतीय आली.

शिक्षक व अन्य स्पर्धांचे निकाल

शिक्षक प्रतिकृती स्पर्धेच्या प्राथमिक विभागात वैशाली पद्मानंद तुम्मे (जि. प. उच्च प्राथमिक शाळा, नांदा), तर माध्यमिक विभागात प्रा. कृतिका काकडे (एकलव्य इंग्लिश स्कूल तथा ज्युनिअर कॉलेज, बिबी) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. प्रयोगशाळा परिचर स्पर्धेत सुदाम लांडे (प्रियदर्शनी विद्यालय, पारडी) प्रथम आले.

निबंध स्पर्धेच्या प्राथमिक विभागात रियांशी ठाकरे (आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल, आवाळपूर) प्रथम, तर स्वरा खोब्रागडे (जि. प. उच्च प्राथमिक शाळा, पालगाव) द्वितीय आली. माध्यमिक विभागात त्रिशा देशमुख (एकलव्य इंग्लिश स्कूल तथा ज्युनिअर कॉलेज, बिबी) प्रथम, तर गौरी खडसे (आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल, गडचांदूर) द्वितीय आली.

वादविवाद स्पर्धेच्या प्राथमिक विभागात भावेश रनदिवे (जि. प. उच्च प्राथमिक शाळा, आसन) प्रथम, तर प्रणय देशमुख (जि. प. उच्च प्राथमिक शाळा, कढोली) द्वितीय आला. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात गौरी खडसे (आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल, गडचांदूर) प्रथम, तर हिमांशु उईके (प्रभू रामचंद्र विद्यालय, नांदा) द्वितीय आला.

आयोजनासाठी सहकार्य

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी कल्याण जोगदंड यांनी केले. संचालन साधन व्यक्ती विकास भंडारवार यांनी केले, तर आभार विठ्ठल टोंगे यांनी मानले.

प्रदर्शनीच्या यशस्वी आयोजनासाठी पंचायत समिती, कोरपना येथील विनोद बरडे, सुनील टेकाम, लीना झाडे, सीमा जिवणे, मनीषा कुसराम, फयाद शेख आणि यांनी सहकार्य केले. आयोजक एकलव्य इंग्लिश स्कूल तथा ज्युनिअर कॉलेज, बिबीचे प्राचार्य नितेश शेंडे, विठ्ठल टोंगे, अखिल अतकारे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये