ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संतोषसिंह रावत यांची गोंदिया जिल्हा व विधानसभा क्षेत्र प्रभारीपदी निवड

काँग्रेस पक्षाकडून जबाबदारी ; मूल तालुका काँग्रेसकडून अभिनंदनाचा वर्षाव

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांच्या सूचनेनुसार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस, माजी चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व संचालक संतोषसिंह रावत यांची गोंदिया जिल्हा व विधानसभा क्षेत्र प्रभारी म्हणून नुकतीच निवड करण्यात आली आहे.

काँग्रेस पक्षाने रावत यांच्यावर सोपविलेल्या या महत्त्वपूर्ण जबाबदारीमुळे मूल तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या निवडीबद्दल मूल तालुका काँग्रेसच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले असून, ही निवड पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

संतोषसिंह रावत हे काँग्रेस पक्षातील अनुभवी नेते असून, जिल्हा परिषद अध्यक्षपदासह सहकार क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांच्या राजकीय व संघटनात्मक अनुभवाचा फायदा गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कामाला होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या निवडीबद्दल महाराष्ट्र प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संतोषभाऊ रावत यांचे मूल तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस आणि सर्व सेलच्या प्रमुखांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

तसेच संतोषसिंह रावत यांचे अभिनंदन करून पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढेल आणि कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये