ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदुर येथे धनोजे कुणबी समाजातर्फे पंडित काळे यांचा गौरव

कुणबी समाज सांस्कृतिक सभागृहाचे उत्साहात उद्घाटन; उद्योग व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदुर :_ येथील धनोजे कुणबी समाज सोसायटी, गडचांदुर यांच्या वतीने समाजासाठी उभारण्यात आलेल्या कुणबी समाज सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पंडित शंकरराव काळे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हा सन्मान रविवारी (ता. १) कुणबी समाज सांस्कृतिक सभागृहात झाला.

गडचांदुर या छोट्याशा शहरातून मोठी झेप घेत युवा उद्योजक पंडित शंकरराव काळे यांनी सिमेंट उद्योग क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास, नागपूर विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजकार्याची प्रभावी छाप पाडली आहे. दालमिया सिमेंट प्लांटकडून त्यांना सर्वोत्कृष्ट कंत्राटदार म्हणूनही सन्मानित करण्यात आले आहे. कुणबी समाजाचे प्रेरणादायी युवा नेतृत्व म्हणून त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.कठीण परिस्थितीतही हार न मानता त्यांनी उद्योग क्षेत्रात नवनवीन संधी निर्माण केल्या असून स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

कार्यक्रमाचे उद्घाटक जनार्धन पहापळे होते, तर अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव चटप होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार देवराव भोंगळे, आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार ॲड. वामनराव चटप, सुदर्शन निमकर, ॲड. पुरुषोत्तम सातपुते, गडचांदुर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष निलेश ताजने, बल्लारपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. अल्का वाढई, भद्रावती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रफुल चटकी, उपनगराध्यक्ष सुधीर सातपुते तसेच सर्वश्री दिनेश चोखारे, राजू धांडे, संतोष थिपे, संजय ढवस, डॉ. विजय हेलवटे, संतोष कुचनकर, नगरसेवक महेश आवारी, नगरसेविका शीतल धोटे, अर्चनाताई मोरे, अरविंद डोहे, चंद्रकांत वासाडे, किसन भोयर, बाळासाहेब मोहितकर, भाऊराव एकरे, रमेशराव राजुरकर, विलास धांडे, पवन राजुरकर व समाज मंदिराचे पदाधिकारी तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये