ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विश्वशांती विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा संपन्न

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्रथम क्रमांक प्राप्त विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे कृतिम बुद्धिमत्ता शाप की वरदान (AI) या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आले. आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक राजेश झोडे तर प्रमुख पाहुणे किशोर संगीडवार,श्वेता खर्चे उपस्थित होते.आयोजित वकृत्व स्पर्धेत एकूण ५० विद्यार्थ्यांनी भाग घेतला.त्यात प्रथम क्रमांक स्पूर्ती गोवर्धन,द्वितीय क्रमांक वेद भुरसे,तृतीय क्रमांक श्रुती कोरडे आणि तन्वी भोयर,चतुर्थ क्रमांक खुशी कुकडे तर पाचवा क्रमांक सक्षम ठाकरे या विद्यार्थ्यांनी पटकाविला असून विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.वकृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून विद्यालयाचे शिक्षक राजू केदार आणि धनंजय गुरनुले यांनी भूमिका बजावली.

कार्यक्रमाचे संचालन विद्यालयाचे शिक्षक भुजंगराव आभारे आणि शिक्षिका प्रनोती सोनुले यांनी केले तर आभार विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक शरदचंद्र पोहणकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयाचे शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदाचे सहकार्य लाभले

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये