ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगर स्वच्छता अभियान व रंगपंचमी उत्सव

२२ वा वर्धापन दिन तथा ग्रामगीता प्रणित धुलीवंदन कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       *ग्राम सुधारणेचा मूलमंत्र l सज्जनानी व्हावे एकत्र ll*

         श्री गुरुदेव सेवा मंडळ भद्रावती चे वतीने नगर स्वच्छता अभियान व रंगपंचमी उत्सव दिनांक ३ मार्च २०२६ रोज मंगळवार ला आयोजित केलेला आहे. या उत्सवामध्ये अनेक भजनी दिंडी सह मिरवणूक व स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे या कार्यक्रमा करिता सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री. गुरुदेव सेवा मंडळ भद्रावती तर्फे करण्यात येत आहे.

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आचरा विचारांचे पाईक भद्रावती येथील श्री. गुरुदेव सेवा मंडळ त्यांच्या अभिनव अश्या उपक्रमांतून सामाजिक दायित्व निभवित असतात. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी धुलीवंदनाचे औचित्य साधून नगर स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आला आहे.

होळीचा पाडवा गोंधळ व व्यसनाने धुंद होऊन साजरा करणे हे सामाजिक व कौटुबिक हिताचे तर नाहीच तद्वतच राष्ट्रसंतांच्या शिकवणुकीचा विपर्यास करणारा आहे.

सेवा मंडळाच्या माध्यमातून भजन मंडळी व गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत भद्रावती शहरात धुलीवंदन सोहळा हा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये