डोडा अंमली पदार्थाची विक्री करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 15 नोव्हेंबर 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथकास मुखबीरतर्फे मिळालेल्या खात्रीशीर खबरेवरून पो.स्टे. समुद्रपुर हद्यीतील राष्ट्रीय महामार्ग क्र 44 लगत मौजा आजदा शिवारातील मुबारीक हरियाणा मेवात हॉटेल येथे एन.डि.पी.एस. कायद्यान्वये रेड केला असता, आरोपी नामे सुरेश शिवराज डारा वय 27 वर्ष, रा. डारा की ढाणी दुगोली जि. नागौर राजस्थान, हा सदर हॉटेलमध्ये हजर मिळुन आला असुन, हॉटेलचे झडतीदरम्यान डोडा अंमली पदार्थ तसेच त्याचे अंगझडती दरम्यान एक अॅन्ड्राईंड मोबाईल मिळुन आला. सदर अंमली पदार्थ हा त्याचे स्वतःचे व मुबारीक खान रा. रूपडाका जि. पलवर राज्य हरियाणा ह.मु. मुबारीक हरियाणा मेवात हॉटेल आजदा, तह. समुद्रपुर चे मालकिचा असुन, ते दोघेही मिळुन हॉटेलमधुन डोडा अंमली पदार्थ विक्रीचा अवैध व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने, जागीचं जप्ती पंचनामा कार्यवाही करून, आरोपीचे ताब्यातुन निव्वळ 10 किलो 400 ग्रॅम डोडा (अफुचे बोंडाचा चुरा)(पॉपी स्ट्रॉ) अमली पदार्थ मोबाईलसह जु.कि. 2,18,000 रू चा मुद्देमाल जप्त करून, दोन्ही आरोपीतांविरूध्द पो.स्टे. समुद्रपुर येथे एन.डि.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, स.पो.नि. आशिषसिंग ठाकुर, पो.उपनि. सिनुकुमार बानोत, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, सागर भोसले, रवि पुरोहित सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.



