ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
जंगलात बकऱ्या चारणाऱ्या इसमावर अचानक वाघाचा हल्ला
गोंडपिपरीतील वनविभागाच्या डेपोमागील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ वनविभागाच्या डेपोमागील जंगल परिसरात बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या गोंडपिपरी येथील राम मंदिर वॉर्ड परिसरातील शेतकरी मधुकर चरडुके या नागरिकावर (दि. १४) शनिवारी दुपारी २ वाजता दरम्यान अचानक वाघाने हल्ला केला.
मात्र, प्रसंगावधान राखत त्यांनी आरडाओरड केल्याने वाघाने त्यांना सोडून पळ काढला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यात मधुकर चरडुके हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यानंतर चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने जंगल परिसरात गस्त वाढवावी व जखमी शेतकऱ्याला तत्काळ मदत करावी, अशी मागणी होत आहे.



