सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाच्या वतीने बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
आदिवासी जननायक स्वातंत्र्य सैनिक क्रांतिसूर्य बिरसामुंडा यांची जयंती देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव राजा, सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय, देऊळगाव राजा, जेष्ठ नागरिक संघटना, देऊळगाव राजा, व जनसेवा सामाजिक संघटना यांच्या वतीने विरंगुळा भवन येथे संघटनेचे अध्यक्ष श्री बळीराम मापारी यांचे अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली, प्रमुख पाहुणे म्हणून भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय चे अध्यक्ष प्रकाश खांडेभराड, मानद संचालक गोविंदराव अहिरे होते,सर्वप्रथम बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी प्रा विजय रायमूल, प्रा.अशोक डोईफोडे, रमेश नरोडे, प्रकाश अहिरे, प्रकाश खांडेभराड यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाला बाबुलाल शिवरकर, मार्तंड आप्पा घिके,उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री प्रकाश अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री अरुण खरात यांनी केले,



