ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून 2 तासात केले अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

         पोलीस स्टेशन पुलगाव हद्दीतील सोनारा ढोक गावात गौरव राजु मांढरे वय 21 वर्ष, रा. सोनोरा (ढोक) याला पाच ते सात इसमानी चाकुने जीवे मारून मौक्यावरुन पसार झाल अशी गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहीतीच्या आधारे पो नी सदाशिव ढाकणे यांनी गुन्हे शोध पथक रवाना करुन गोपनीय माहीतीच्या आधारे सदर आरोपीचे नाव निष्पन्न करुन तात्काळ तांञीत विश्लेशनावरुन आरोपी हे वर्धा जवळ असल्याची माहीती प्राप्त झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास माहीती दिल्याने स्था गु शा पथक वर्धा यांनी 6 आरोपीस ताब्यात घेऊन पुलगाव पोलीस ठाण्यात ताब्यात दिले.

           सदर कार्यवाही मा .पोलीस अधिक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल , मा. अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, प्रभारी उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. सुशील कुमार नायक यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी आणि पोलीस स्टेशन पुलगांव चे पोलीस निरिक्षक श्री सदाशिव ढाकणे यांचे निर्देशाप्रमाणे DB चे पोहवा कुणाल हिवसे, पोलीस नाईक राजु वैद्य, पो शि संदिप बोरबन, पो शि अमोल आडे, पो शि, सोमेश गंथाडे, पो शि सत्यप्रकाश काकन, व स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी आशिष ठाकुर, पोउपनी शिवकुमार बानोत, पोउपनी विजय गोमलाडु यांचे नेतृत्वातील पोहवा शेखर डोंगरे, पोहवा नरेश पाराशर, पो शि शुभम राऊत, पो शि सुगम चौधरी, पो शि. अभिषेक नाईक, पो शि हर्षल सोनटक्के, पो शि रामेश्वर नागरे यांनी केली.

        मयत इसम आणि आरोपी हे एकमेकांचे मित्र असून काही दिवसापूर्वी झालेल्या शाब्दिक वादावरून आरोपींनी सदरचा खून केला आहे. पुढील तपास पुलगांव पोलीस स्टेशन चे सपोनी नितीन मदनकर हे करित आहे.

1. अमन अनंतराव भरणे वय 22 वर्ष राहणार सोनोरा ढोक तालुका देवळी

2. रोहित मनोज नारनवरे वय 21 वर्षे राहणार सोनोरा ढोक तालुका देवळी

3. प्रेम बोंडाले वय १९ वर्ष राहणार सोनोरा ढोक तालुका देवळी

4. त्रिशूल बावणे राहणार वय 20 राहणार भाईपुर पुनर्वसन तालुका आर्वी आणि  02 विधीसंघर्षग्रस्त बालके (अल्पवयीन) ताब्यात घेतली आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये