ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध्यरीत्या डिझेल-पेट्रोलची वाहतुक

चारचाकी वाहनासह एकुण ५ लाख ७३ हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक २८/०२/२०२६ रोजी स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा चे पथक मा. पोलीस निरीक्षक सा. स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांचे आदेशाने उप विभाग वर्धा परीसरात अवैध्य व्यवसायावर कार्यवाही करने करीता पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय बातमीदाराकडुन माहीती प्राप्त झाली की, दोन ईसम त्यांचे ताब्यातील पांढऱ्या रंगाची मारोती सुझुकी कंम्पनीची ईको चारचाकी गाडी कमांक एम.एच. ३२ ए.एस. ४८४३ मध्ये वेगवेगळ्या प्लॉस्टीक डबकी मध्ये अत्यंत ज्वलनशिल पदार्थ पेट्रोल व डिझेल भरुन त्यांचे ताब्यात बाळगुन महीलाश्रम परीसरातील इंडीयन ऑईल कंम्पनीचे राजपाल पेट्रोलपंप येथे अवैध विक्री करीता वाहतुक करुन घेवुन येत आहे.

अशा माहीती वरून स्थानीक गुन्हे शाखेचे ०२ पथक हे महीलाश्रम परीसरातील वर्धा ते सेवाग्राम रोडवरील इंडीयन ऑईल कंम्पनीचे राजपाल पेट्रोलपंप जवळ दबाधरुन बसुन असतांना थोड्यावेळातच माहीती प्रमाणे एक पांढऱ्या रंगाची मारोती सुझुकी कंम्पनीची ईको चारचाकी गाडी क्रमांक एम.एच. ३२ ए.एस. ४८४३ ही सेवाग्राम रोड कडुन वर्धा रोडवरील महीलाश्रम परीसरातील इंडीयन ऑईल कंम्पनीचे राजपाल पेट्रोलपंपा कडे येतांना दिसली सदर गाडी ही माहीती प्रमाणे असल्याची खात्री पटल्यानंतर तीला पोलीस स्टॉपचे मदतीने पेट्रोलपंपा जवळ थांबवीले असता सदर गाडी मध्ये वाहन चालक आरोपी नामे १) समीर शकील शेख, वय २२ वर्षे, राहणार विकासचौक, सेलु, ता. सेलु जि. वर्धा व त्याचे सोबत २) रविंद्र विठ्ठलराव चोरे, वय ४५ वर्षे, राहणार-केळझर ता. सेलु जि. वर्धा हे मिळुन आले त्यांचे ताब्यातील पांढऱ्या रंगाची मारोती सुझुकी कंम्पनीची ईको चारचाकी गाडी कमांक एम.एच. ३२ ए.एस. ४८४३ ची पाहणी केली असता सदर गाडीचे मागील डिक्कीत व मध्य भागी असलेल्या सिटवर १) १४ प्लॉस्टीक डबकी मध्ये प्रत्येकी २० लीटर प्रमाणे एकुण २८० लीटर पेट्रोल आजचे बाजार भावा प्रमाणे प्रती लीटर १०४/- रु प्रमाणे एकुण किंमत २९,१२०/-रु, २) ०६ प्लॉस्टीक डबकी मध्ये प्रत्येकी २० लीटर प्रमाणे एकूण १२० लीटर डिझेल आजचे बाजार भावा प्रमाणे प्रती लीटर ९१/-रु प्रमाणे एकुण किंमत १०,९२०/-रु, ३) २० प्लॉस्टीक डबकी किंमत ६,०००/-रु, ४) एक पांढऱ्या रंगाची मारोती सुझुकी कंम्पनीची ईको चारचाकी गाडी क्रमांक एम.एच. ३२ ए.एस. ४८४३ किंमत ५,००,०००/- रु, ५) दोन अॅन्ड्राईड मोबाईल किंमत २७,०००/-रु असा एकुण जु. किंमत ५,७३,०४०/- रु चा मुद्देमाल दोन्ही आरोपीतांचे ताब्यातुन मिळुन आल्याने त्यांना सदर गाडी मध्ये पेट्रोल व डिझेल भरुन वाहतुक करण्याचा पासपरवाना विचारला असता तो त्यांचे कडे नसल्याचे सांगुन त्यांचे कडे पेट्रोल व डिझेल खरेदी केल्यांचे कोणत्याही पावत्या नसल्याचे सांगीतले. तसेच त्यांना पेट्रोल व डिझेल कोठुन आनले याबाबत विचारले असता आरोपी कमांक २ यांनी त्यांचे केळझर परीसरातील ढाब्यावर रोडने जाणारे येणारे पेट्रोल व डिझेल चे टँकर चालकांकडुन स्वतःचे फायदया करीता कमी भावाने खरेदी केलेले असुन ते साठवणुक करुन महीलाश्रम परीसरातील इंडीयन ऑईल कंम्पनीचे राजपाल पेट्रोलपंप चे मालक आरोपी गिरीश राजपाल, राहणार मोहीनीनगर, वर्धा यांना ज्यास्त भावाने विकी करीता त्यांनी वाहतुकी करीता दिलेले पांढऱ्या रंगाची मारोती सुझुकी कंम्पनीची ईको चारचाकी गाडी क्रमांक एम.एच. ३२ ए.एस. ४८४३ भरुन वाहन चालकाचे मदतीन आनल्याचे सांगीतले. तसेच पेट्रोलपंप मालक गिरीश राजपाल यांना नियीमत पणे पेट्रोल व डिझेलची विक्री करीत असल्यांचे सांगीतले. वरुन तिन्ही आरोपीतांन विरुध्द पोलीस स्टेशन वर्धा (शहर) येथे अप कमांक १६९/२०२६ कलम ३, ७ जिवनावश्यक वस्तु अधिनीयम १९५५, सहकलम २८७, ३(५) भारतीय न्याय सहीता सन २०२३, सहकलम ८ पेट्रोलियम अधिनीयम १९३४, सहकलम ३(१)१८१, १३०/१७७ मोटर वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सहा.पो.नी. आशिषसिंह ठाकुर, पोलीस अंमलदार चंद्रकांत बुरंगे, सचिन इंगोले, भुषन निघोट, प्रमोद पिसे, अमोल नगराळे, मंगेश चावरे, अरविंद इंगोले, सर्व नेमणुक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा. यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये