कुसळ येथे विकासासाठी तत्पर : आ.देवराव भोंगळे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना :_ तालुक्यातील कुसळ येथे हजरत अ.रहेमान दुल्हेशाह बाबा रहे अलैह यांच्या ऊर्स निमित्त दुय्यम कव्वालीच्या जंगी कार्यक्रमाकरिता राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय दमदार आमदार देवरावदादा भोंगळे यांच्यासोबत उपस्थित होतो.
कोरपना तालुक्यातील कुसळ येथे गेल्या मागील अनेक वर्षांपासून ऊर्स निमित्त मोठी यात्रा भरत असते तसेच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी भेट देत असतात. कुसळ येथे दुल्हेशाह बाबा येथे हिंदू-मुस्लिम समाज बांधव मोठ्या प्रमाणात भक्ती भावाने आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात, तसेच दरवर्षी जंगी दुय्यम कव्वालीचा मुकाबला सुद्धा आयोजित करण्यात येतो,सदर कव्वाली बघण्याकरिता हजारोच्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित असतात.
कुसळ येथील तीर्थक्षेत्राला “क”दर्जातून “ब” दर्जा देण्याकरिता महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करू व या परिसराच्या विकासासाठी आपण प्रयत्न करू तसेच मागील अनेक वर्षापासून आपण भक्ती भावाने या दर्ग्यामध्ये भेट देत असून कौमी एकतेचे प्रतीक असलेल्या या दर्ग्यामध्ये मोठी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येत असतात असे राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवरावदादा भोंगळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
यावेळी उर्फ कमिटीचे अध्यक्ष सय्यद आबिद अली,कोरपना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक लता वाढिवे, गडचांदूरचे नगराध्यक्ष निलेशजी ताजने,कोरपना नगरपंचायत उपाध्यक्ष इस्माईल शेख,तालुका अध्यक्ष संजय मुसळे, गडचांदुर भाजपा शहर अध्यक्ष अरुण डोहे,आशिष ताजणे.नगरसेवक महेशजी आवारी, अबरार अली ईस्माइल ढाकवाला, निसार शेख, मोहम्मद शेख, मकसूद पारेख, रजीक खान, हबीब शेख,प्रमोद कोडापे, तिरुपती किन्नाके, मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुहेल अली यांनी केले.



