ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
बुशरा फातेमा हिने वयाच्या सातव्या वर्षात जीवनातील पहिला उपवास केला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा येथील बुशरा फातिमा ईकराम शाह यांनी वयाच्या सातव्या वर्षात आपल्या जीवनातला पहिला उपवास धरला आहे .इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्यात उपवास ठेवण्याचे महत्त्व आहे.
या महिन्यात 30 दिवसाचे उपवास धरण्याची पद्धत असते म्हणून लहान मुलांना उपास ठेवण्याची सवय व्हावी म्हणून लहान मुलांकडून उपवास ठेवल्या जातात, बुशरा फातिमा ह्या लहान मुलींने वयाच्या सातव्या वर्षात पहिला उपवास ठेवला आहे, दिवसभर अन्नाचा एक ही कण न खाता, पाण्याचा थेंब न पिता आपला उपवास पूर्ण केला आहे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



