किन्ही पवार येथे शेतातील विहिरी च्या वादातून माय लेकास मारहाण
2 आरोपी विरोधात गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
किन्ही पवार येथील शेत शिवारात शेतातील विहिरी च्या वादातून एका महिलेस व तिच्या मुलास दोघांनी मारहाण केल्याची घटना 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता घडली.
सविस्तर वृत्त असे की, किन्ही पवार येथील सौ अहिल्याबाई भीमराव खरात व तिचा मुलगा किन्ही शिवारातील शेतामधील शेतात गहु पेरण्यासाठी शेत भिजविण्याकरीता त्यांचे सामायीक विहीरीवर मोटार पंप घेवुन गेले असता आरोपी अविनाश गौतम खरात व पवन गौतम खरात यांनी ही विहीर आमचे मालकीचे असुन या विहीरीवर तुम्ही मोटार टाकु नका असे म्हणुन फिर्यादीस अश्लील शिवीगाळ केली. तसेच फि चे केस धरून फि हीस खाली लोटुन दिले त्यामुळे फि खाली पडुन फि चा उजवा हात फॅक्चर झाला आहे. त्यानंतर दोघांनी फिस खाली पाडुन लाथा बुक्क्यांनी डोक्यावर पाठीवर मारहान केली तसेच फि चा मुलगा अविनाश याला सुध्दा चापट बुक्क्यांनी मारहान केली व तुम्ही जर पुन्हा या विहीरीवर आले तर एक एकाला विहीरीत टाकुन जिवाने मारून टाकु अशी धमकी दिली.
घटनेची तक्रार पोलिस ठाण्यात 1 डिसेंबर रोजी दुपारी दाखल करण्यात आली असून पोलिसांनी 2 आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ काकड करीत आहे .



