भाजप उमेदवार सुरज पांडे यांनी राका उमेदवाराच्या भावाला मारली विट
चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदुरा येथे भाजपचे प्रभाग ९ चे उमेदवार सुरज पांडे ह्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अरुण निमजे यांचे भाऊ प्रकाश निमजे यांना (६५) वीट फेकून मारली. त्यामुळे त्यांच्या डाव्या बाजूच्या कानाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सुरज पांडे ह्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून भाजपने त्याला उमेदवारी दिल्याने भाजप विरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. गुन्हेगाराला लोकांच्या स्वाधीन करा म्हणून पोलिस स्टेशनमध्ये सर्व पक्ष नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे शहरांमधील वातावरण दूषित झाले असून त्याला त्वरित तडीपार करण्यात यावे अशी मागणी आंदोलनकर्ते करीत आहे. निषेध करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी शहरांमधून रॅली काढून मार्केट बंद करण्याचा निर्धार केला आहे.



