ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडवाना विद्यापीठस्तरिय फुटबॉल स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालय विजयी

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालय सुवर्णपदक पटकाविले आहे. गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा एम.जे.एफ.कॉलेज, आष्टी येते आयोजीत करण्यात आली होती. स्पर्धेकरिता चंद्रपूर व गडचिरोली परीक्षेत्रातील विविध महाविद्यालयांच्या संघानी सहभाग घेतला.

या फुटबॉल स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने विजेतापद पटकाविले. विजेतेपद खेचून आणण्याकरिता मुलांच्या संघात रवी राजभार , रोहित मंडल , सुमन सरकार , पंकज बावरे, जीत मंडल ,यश धकाते, अनुच येनूरकर, तेजस दमभारे, संस्कार बडकेलवार, चंदन मजुंबर, सुबोध गुरले, राजेश मंडल, अरीहंत यादव, गौरव झाडे यांनी आपल्या सुरेख खेळ, रणनीती व कौशल्याचे प्रदर्शन केले.

दरम्यान संघाच्या या यशाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेडीवार कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव की वर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गइमवार, सर्वोदय शिक्षण मंडळचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जीनेश पटेल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, प्रभारी प्रबंधक विनोद चोपावर, कला विभाग प्रमुख डॉ. सुनीता बन्सोड, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. विजय वाढई, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. राहुल सावलीकर, संगणक विभाग प्रमुख डॉ. एस. बी. किशोर, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. पुष्पांजली कांबळे, प्रा. विकी पेटकर, हनुमंत डभारे, आदित्य मंगरूळकर, प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये