ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना तालुक्यातील रूपापेठ येथे आदिवासी,एकलव्य इंग्लिश रेसिडेन्सी पब्लिक स्कूलची निर्मिती करा

आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.अशोकजी उईके यांना युवा आदिवासी नेते प्रमोद कोडापे यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

      कोरपणा तालुक्यातील रूपापेठ येथे आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी समाजाच्या दर्जेदार शैक्षणिक प्रगतीच्या अनुषंगाने, व शैक्षणिक विकास उद्दिष्ट पूर्तीच्या दृष्टिकोनातून आदिवासी विद्यार्थ्यांना बदलत्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या काळाच्या हिशोबाने उत्तम दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता, कोरपणा तालुक्यातील रूपापेठ येथे आदिवासी विकास विभागाच्या वतीने एकलव्य इंग्लिश रेसिडेन्सी पब्लिक स्कूल ची निर्मिती मंजुरी देऊन करण्यात यावी करिता व कोरपणा तालुक्यातील आदिवासी मुला मुलींचे वसतिगृह या खाजगी इमारती भाडेतत्वावर असल्यामुळे, शैक्षणिक, भौतिक सोयी-सुविधेचा अभाव असल्याचे दिसून येते. त्यामुळे आदिवासी विकास विभागाच्या वतीने कोरपना हे तालुक्याचे ठिकाण असल्याने सभोवतालील ग्रामीण परिसरातील विद्यार्थी कोरपना येथे शिक्षणास येत असतात.

सदर आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक व शासकीय वसतीगृहातील भौतिक सोयी सुविधेच्या अनुषंगाने कोरपना येथे आदिवासी मुला मुलींच्या शासकीय वस्तीगृहाच्या इमारतीची निर्मिती करण्यात यावी, व कोरपना तालुक्याला ठक्करबाप्पा योजनेचा निधी लक्षांक वाढवून देण्यात यावा आदी मागण्यांचे पत्राद्वारे प्रत्यक्षात भेट घेऊन निवेदन आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री डॉ.अशोकजी उईके यांना सादर केले. व त्याचबरोबर सदर कामाला गती मिळावी याकरिता माजी मंत्री,तथा बल्लारपूर विधानसभा चे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार व देवरावदादा भोंगळे आमदार राजुरा विधानसभा यांच्या मार्गदर्शनात पत्रद्वारे प्रत्यक्षात भेट घेऊन पाठपुराव्याची विंनती करणार,यावेळी कोरपणा तालुक्यातून प्रेमदासजी मेश्राम, भारत आत्राम, मनोज तुमराम सदस्य ग्रां. पं. रूपापेठ तथा तालुकाध्यक्ष भाजपा आदिवासी आघाडी कोरपना हे उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये