शनिवारी चंद्रपूरात “युग प्रवर्तक डॉ.हेडगेवार”महानाट्य _ आ.सुधीर मुनगंटीवार यांचे आयोजन
पत्रपरिषदेत डॉ.अजय प्रधान यांची माहिती

चांदा ब्लास्ट
या वर्षी संघाच्या स्थापनेचे शताब्दी वर्ष आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 मध्ये पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी केली होती. त्याआधीही या संघटनेचे स्वरूप आणि ते किती काळ टिकेल याचा विचार करणारे महापुरुष “युग प्रवर्तक डॉक्टर हेडगेवार” होते. देशासाठी शहीद होणे ही निःसंशयपणे एक सन्माननीय आणि इष्ट गोष्ट आहे, परंतु त्याहूनही कठीण म्हणजे ध्येय साध्य करण्यासाठी जीवनाचा प्रत्येक क्षण समर्पित करणे, तो राष्ट्राला समर्पित करणे आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे.डॉ हेडगेवारांचे विचार आजही किती प्रासंगिक आहेत हे जाणून घेण्यासाठी नादब्रह्म निर्मित युगप्रवर्तक डॉ हेडगेवार हे महानाट्य बघितले पाहिजे.चंद्रपूरला हे आयोजन आ.सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी(दि 19)प्रियदर्शिनी इंदिरा गांधी नाट्यगृहात सायंकाळी 6 वाजता केले आहे.प्रवेश निःशुल्क असून नागरिकांनी लाभ घ्यावा असे अवाहन नाट्य लेखक डॉ अजय प्रधान यांनी पत्रपरिषदेत मंगळवारी(दि15)केले.
यावेळी महानाट्याचे निर्माता पद्माकर धानोरकर,दिग्दर्शक सुबोध सुर्जीकर,आयोजन समितीचे राजू गोलीवर,राजेंद्र गांधी,विजय राऊत,राहुल पावडे,डॉ मंगेश गुलवाडे,सविता कांबळे,अनिरुद्ध भालेराव आदींची मंचावर उपस्थिती होती.
डॉ प्रधान म्हणाले,जेव्हा जग भौतिकवादाच्या शिखरावर आहे आणि निराश होत आहे, तेव्हा आपल्याला मानवतेच्या मूल्यांचे पुनरुज्जीवन करावे लागेल.
भारतमातेच्या सर्व सुपुत्रांनी हे नाटक पाहिले पाहिजे आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात स्वतःला गुंतवून घेतले पाहिजे. जर तुम्ही तुमचा प्रत्येक क्षण राष्ट्रासाठी समर्पित केला तर आम्हाला विश्वास आहे की आमची मातृभूमी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. आजच्या तरुणांमध्ये राष्ट्रीय जाणीव जागृत करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे,अशी माहिती त्यांनी दिली.