जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी लाखोच्या संख्येने पेन्शन जनक्रांती
महामोर्चा 15 डिसेंबरला धडकणार विधिमंडळावर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
चंद्रपूर :- 1 नोव्हेंबर 2005 व त्यानंतर लागलेल्या राज्य सरकारी कर्मचारी यांना 1982/84 ची जुनी पेन्शन मिळावी मागील 10 वर्षांपासून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना वेगवेगळी आंदोलन करीत आहे. या वेळेस हिवाळी अधिवेशनात नागपूर येथील विधीमंडळावर जुन्या पेन्शनसाठी पेन्शन जनक्रांती महामोर्च्याचे आयोजन 15 डिसेंबर 2025 ला करण्यात आले आहे. यासंदर्भात प्रचार, प्रसार व जाणीव जागृतीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना चिमूरच्या वतीने जनता विद्यालय नेरी येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना चंद्रपूर च्या जिल्हा सभेचे आयोजन 30 नोव्हेंबर 2025 ला करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष विपीन धाबेकर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा सचिव लखन साखरे सर, वरिष्ठ उपाध्यक्ष माधव पिसे, राज्य प्रतिनिधी डॉ. गुलाब लाडे, खाजगी विभाग प्रमुख सतीश मेश्राम , वरोरा माजी तालुकाध्यक्ष संदिप चौधरी , चिमुर तालुकाध्यक्ष जनार्दन केदार सर, सहभागी सात ही तालुक्याचे अध्यक्ष, सचिव व तालुका पदाधिकारी उपस्थित होते. व चिमूर तालुक्यातील असंख्य शिलेदार उपस्थित होते सभेचे संचालन चिमूर तालुका सचिव वैभव चौधरी तर सभेचे आभार चिमूर तालुका कार्याध्यक्ष सरोज चौधरी यांनी केले.
आपण 10 वर्षांपासून सतत आंदोलन करीत आहोत त्यामुळे फॅमिली पेन्शन व graduty चा लाभ आपल्याला मिळालेला आहे तेव्हा जुन्या पेन्शनसाठी 15 डिसेंबर 2025 ला होत असलेल्या पेन्शन जनक्रांती महामोर्चा नागपूर येथे हजारोच्या संख्येने उपस्थित राहुन आपल्याला 1982/84 ची जुनी पेन्शन लावण्यासाठी सरकारला भाग पाडूया.
श्री. विपीन धाबेकर, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना चंद्रपूर
1 नोव्हेंबर 2005 व त्यानंतर नियुक्त कर्मचारी यांना जुनी पेन्शन द्यायला सरकारला पैसा नाही पण स्वतःची पेन्शन व भत्ते वाढवायला पैसे आहेत. 1 नोव्हेंबर 2005 व त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्याना असलेली पेन्शन आमदार खासदार यांना पण लागू करावी.
श्री. लखन साखरे,जिल्हासचिव, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना चंद्रपूर



