ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
बाबासाहेबांच्या पुतळ्याचे ऑडिट स्ट्रक्चर करा
विजय वानखेडे यांचे नगरपरिषद कार्यालयात निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील बाबासाहेबांचा पुतळा हा अत्यंत जिर्ण झाला असून वातावरणातील बदलामुळे पुतळ्याची हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर पुतळ्याचे आडीट स्ट्रक्चर करून तज्ञ समिती स्थापन करा व पुतळ्याचे योग्य ते संरक्षण करा.
अशी मागणी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे यांनी नगरपरिषद कार्यालय तथा आमदार करण देवतळे यांना सादर करण्यात आलेल्या एका निवेदनातून केली आहे.
तज्ञांकडून पुतळ्याची पाहणी करून आवश्यक ती उपायोजना करावी व पुतळा तथा चौकाचे शोभेल असे सौदरीकरण करावे अशी मागणीही सदर निवेदनातून करण्यात आली आहे.