शिवसेनेचा विजयी एल्गार
मोबाईल टॉवरचे अवैध बांधकाम अखेर थांबले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
गौतम नगर येथे उभारण्यात येणाऱ्या तिसऱ्या मोबाईल टॉवरच्या अवैध बांधकामावर अखेर नगर परिषद भद्रावतीने स्थगिती आणली असून त्यासंदर्भात अधिकृत पत्रही जारी करण्यात आले आहे.
सदर मोबाईल टॉवरविरोधात शिवसेनेने सातत्याने संघर्ष केला. परिसरात 20 मीटर आणि 100 मीटर अंतरावर दोन मोबाईल टॉवर आधीच कार्यरत असताना, तिसऱ्या टॉवरची उभारणी ही लोकांच्या आरोग्यावर घातक ठरणारी होती.
याच परिसरात हृदयरोगी वृद्ध नागरिक राहतात, त्यामुळे रेडिएशनमुळे होणाऱ्या संभाव्य आजारांचा धोका वाढत होता.
यासंदर्भात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन भाऊ मत्ते यांच्या मार्गदर्शनात व शिवसैनिक सुरज भाऊ शाहा यांच्या नेतृत्वात नगर परिषद मुख्याधिकारी मॅडम यांना जोरदार निवेदन देण्यात आले होते. यावेळी युवा शिवसैनिक सुमित हस्तक, उपतालुकाप्रमुख सिंगलदीप पेंदाम, दीप गारघाटे, राज चव्हाण, आणि समस्त गौतम नगर वासी उपस्थित होते.
या पाठपुराव्याला यश येत, नगर परिषद भद्रावतीने टॉवरचे काम तात्काळ थांबविण्याचे पत्र जारी केले आहे. यावर समस्त गौतम नगर वासियांनी शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
“हा जनतेच्या आरोग्यासाठीचा लढा होता – आणि या लढ्याला अखेर न्याय मिळाला!” शिवसेनेने स्पष्ट केलं आहे की, भविष्यातसुद्धा आरोग्य, पर्यावरण आणि जनहिताशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही प्रकल्पांना शिवसेना थांबवेल – जनतेच्या बाजूनेच उभी राहील!
*सुरज शहा शिव सेना एकनाथ शिंदे गट*