वडिलांनंतर खंबीर आधार देणारा देव हरपला _ आमदार मनोज कायंदे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
अजित दादांच्या अपघाताची बातमी समजताच विश्वास बसतच नव्हता. मनामध्ये सततची घालमेल चालू होती परंतु नियतीने जे मान्य केले ते आपल्याला मान्यच करावे लागेल. एक ते दीड वर्षांपूर्वी वडिलांचे स्वर्गीय देवानंद जी कायंदे यांचे निधन झाले. राजकारणात तसेच सर्वच क्षेत्रात मी पोरका झालो.
काही दिवसानंतर विधानसभा निवडणुका लागल्या दादांच्या तोंडी नेहमी शब्द असायचा युवकांना संधी द्या. त्यांनी सुद्धा सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात मला संधी दिली. त्याच क्षणी वडिलांची आठवण झाली.
दादांचे आशीर्वाद आणि मतदार संघातील जनतेचे आशीर्वाद त्यामुळे मी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत असताना प्रत्येक भेटी दरम्यान दादा वडिलांप्रमाणे सर्व छोट्या मोठ्या गोष्टींचा आढावा माझ्याकडून घेत होते विकासाचा चढता आलेख कसा ठेवायचा याचे बाळकडूच जणू दादा कडून मिळायचे, कामात सातत्य ठेवा यश निश्चित येईल हे दादांचे शब्द क्षणोक्षणी तसेच पदोपदी आठवण करून द्यायचे विरोधकांकडून सुद्धा काही शिकायला मिळत असते त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका हे शब्द आजही कानात गुंजतात.. दादांच्या जाण्याने महाराष्ट्र सह सिंदखेड राजा मतदार संघाची अपरिणित हानी झाली.
वडिलांनंतर खंबीर आधार देणारा देव हरपला.. अशा शब्दात आमदार मनोज कायंदे, यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत



