राज्यातील संपूर्ण जैन समाज हा पवार परिवाराच्या दुःखात सहभागी
क्रांतिकारी राष्ट्रसंत आचार्य श्री गुप्तिनंदिजी गुरुदेव.
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व राज्याच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे रोखठोक भूमिका घेऊन काम करणारे त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये समाज पूरक विकास हा प्रथम स्थानी होता असे अजित दादा पवार यांचे दिनांक 28 जानेवारी 26 रोजी सकाळी विमान दुर्घटनेत बारामती परिसरात दुखद असे निधन झाले ह्या घटनेबाबत जैन समाजाचे क्रांतिकारी राष्ट्रसंत आचार्य श्री गुप्तिनंदिजी गुरुदेव यांनी त्यांच्या विहारादरम्यान मनमाड येथे थांबून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतांना शोक संदेशात म्हटले आहे की त्यांच्या निधनाने जैन समाज हा पोरका झाला असून राज्यातील संपूर्ण जैन समाज पवार परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. पुढे शोकसंदेशात त्यांनी सांगितले की पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री हे अतिशय कर्तव्यदक्ष मंत्री म्हणून सर्व दूर परिचित होते राज्याच्या सर्वांगीण विकासामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता शिस्तबद्ध, नियोजनबद्ध, व अभ्यासपूर्वक ते काम करायचे त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राची फार मोठी हानी झालेली आहे त्यांच्या निधनाची वार्ता मनाला क्षुब्ध करून सोडणारी आहे ते जन जन चे नेता होते राज्यातील संपूर्ण जैन समाजावर सुद्धा हा फार मोठा आघात असून संपूर्ण जैन समाज त्यांच्या दुःखात सहभागी आहे ईश्वर त्यांच्या परिवारातील सदस्यांना हे दुःख पेलण्याची शक्ती देवो अशी विनंती त्यांनी भगवंताच्या चरणी करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.



