दारू पिऊन दारूच्या नशेत वाहन चालवीणारे चालक यावर वाहतूक पोलिसांची कार्यवाही
गुन्हा दाखल वाहन केले जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि. 17/03/26 रोजी मा.पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल सर यांच्या आदेशानवये बजाज चौकात वाहतूक अंमलदार यांची नाकाबंदी वाहन चेकिंग ड्युटी नेमण्यात आलेली होती, त्यावेळी ASI धीरज पांडे, ASI मंगेश येळणे, HC आशिष देशमुख, किशोर पाटील हे ड्युटीवर असताना एक मोटार सायकल चालक विना नंबर चि मोटार सायकल घेवून अतिवेगाने वाहन चालवीतना मिळून आला त्याचे जवळ जावून त्याचे लायसेन्स विचारले असता त्याचे जवळ लायसेन्स नव्हते व त्याचे तोंडाचा दारू पिण्याचा वास आंबट उग्रट वास पोलिसांना आला त्यावरून वाहतूक पोलिसांनी त्याची दारू बाबत मेडिकल तपासनी केली असता त्याचे रक्त्तात 229 ml अल्कोहोल हे मिळून आले, त्यावरून वाहतूक अंमलदार ASI धीरज पांडे यांनी दिलेल्या तक्रार वरून वाहन चालक मेघराज मनोहर भागवत वय 26 रा गणेश नगर वर्धा यांचया विरुद्ध मोवाका 184.185 3/181 कलमअन्वये गुन्हा वर्धा शहर पो स्टेशन ला नोंदवून सदर वाहन हे जप्त करण्यात आलेले आहे
पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा वर्धा



